कोकण

तीन व चार चाकी वाहनांसाठी गॅस किट ; सतीश सावंत

जिल्हा बँकेची सिंधु सारथी सीएनजी किट कर्जपुरवठा योजना

- नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील तीन चाकी व चार चाकी वाहनांसाठी गॅस किट बसविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्यावतीने सिंधु सारथी सीएनजी किट कर्जपुरवठा योजना सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पेट्रोलच्या वाढत्या किंमती विचारात घेता सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांसाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. नवीन उत्पादित होणारी वाहने ही पेट्रोलबरोबरच सीएनजी गॅस, इथेनॉल किंवा इलेक्ट्रिकवर चालणारी असण्याचे शासनाने निर्धारित केले आहे. नवीन निर्मिती होणाऱ्या बहुतांशी वाहनांमध्ये कंपनीमार्फत असे किट बसवूनच बाजारात आणले जाते. जुन्या वाहन्यांसाठी आरटीओ अथॉराईज कंपनीद्वारे असे कीट बसविण्यात येते. या कीटसाठी रिक्षा व्यावसायिकांकडे एकरकमी एवढी रक्कम उपलब्ध होण्यामध्ये अडचणी असतात. याचा विचार करून बँकेच्या संचालक मंडळाने 'सिंधु सारथी' सीएनजी किट कर्ज पुरवठा योजना सुरु करण्याचा निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती श्री. सावंत यांनी यावेळी दिली.

जिल्हा बँकेच्या सिंधू सारथी सीएनजी किट कर्जपुरवठा योजनेमध्ये तीन चाकी वाहनांसाठी असे किट बसविताना अथॉराईज डिलरच्या कोटेशनच्या ९० टक्के किंवा ३० हजार यापैकी कमी असणारी रक्कम कर्ज मर्यादा राहील. चार चाकी वाहनांसाठी असे कीट बसविताना अथॉराईस डिलरच्या कोटेशनच्या ९० टक्के किंवा ५० हजार रुपये यापैकी कमी असणारी रक्कम कर्ज मर्यादा राहील. या योजनेत कर्जाचा व्याजदर १० टक्के असून कर्ज परतफेड कालावधी ३६ महीने ( तीन वर्षे) एवढा राहिला. वाहनाच्या आरसी बुकवर बँकेचा बोजा प्रथम निर्माण करून देणे आवश्यक राहील. ज्या वाहनावर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा बोजा आहे, अशांना जामीनदार देण्याची आवश्यकता नाही.

अन्य रिक्षा व्यावसायिकांसाठी बँकेत खाते असलेले दोन सक्षम जामीनदार देणे आवश्यक राहील. कर्जाच्या नियमित परतफेडीसाठी रिक्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा क्यूआर कोड बसवून प्रतिदिन ५० रुपये मात्र रक्कम कर्ज खात्यामध्ये जमा करणे आवश्यक राहील. या कर्जासाठी दहा वर्षाच्या आतील वाहन असणे आवश्यक राहील. जास्तीत जास्त वाहनधारकांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी तात्काळ व जलद कर्ज मिळण्यासाठी कर्ज मंजुरीचे अधिकार शाखा व्यवस्थापक यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वाहनधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. सावंत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT