gava reda Attack man survived banda konkan sindhudurg 
कोकण

थरारक! गव्यांच्या तावडीतून शेतकरी सुटला

निलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) - शहरात राममंदिर नजीक शेतातून गुरे घेऊन घरी परतताना शेतकरी सदाशिव सावंत यांच्यावर दोन गव्यांनी भरदिवसा पाठलाग करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सावंत यांनी लगबगीने जवळील झाडीचा आसरा घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. दिवसाढवळ्या गव्यांचा वावर मानवी वस्तीनजीक वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांदा-गडगेवाडी येथील शेतकरी सदाशिव सावंत यांची शहरातील राममंदिर नजीक शेतजमीन आहे. ते नियमित गुरांना चारविण्यासाठी याठिकाणी घेऊन जातात. आज सकाळी गुरांना घेऊन घरी परतत असताना भर रस्त्यातच त्यांना दोन गव्यांचे दर्शन झाले. सावंत यांनी गव्यांना जंगलात हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यातून गवे बाजूला होत नव्हते. त्यांनी रस्त्यातच ठाण मांडल्याने सावंत यांना घरी परतणे मुश्‍किल झाले.

तब्बल अर्धा तास गवे याठिकाणी होते. यावेळी गव्यांना हुसकावून लावताना दोन्ही गव्यांनी सावंत यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने पाठलाग केला. सावंत यांनी प्रसंगावधान दाखवत लागलीच जवळच्या झाडीचा आसरा घेतला, त्यामुळे ते हल्ल्यातून बालंबाल बचावलेत. हा रहदारीचा रस्ता आहे; मात्र गवे याठिकाणी बिनधास्त वावरत होते. सावंत यांनी सांगितले की, त्यांना नेहमीच शेतात ये-जा करताना गव्यांचे दर्शन होते; मात्र आज गव्यांनी पाठलाग केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

शेतीचे अतोनात नुकसान 
या परिसरात शेतकऱ्यांनी उन्हाळी कडधान्ये व भाजीपाला पिकविला आहे, मात्र गव्यांनी शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. नुकसानी बरोबरच आतातर गवे शेतकऱ्यांवर हल्ले करू लागल्याने वनखात्याने गव्यांचा बंदोबस्त करावा व शेती नुकसानीचे पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT