gavareda Damage agriculture konkan sindhudurg 
कोकण

ओटवणे-कापईवाडीत गव्यांचा हैदोस 

महेश चव्हाण

ओटवणे (सिंधुदुर्ग) - कापईवाडी भागात गव्या रेड्यांच्या कळपाने अक्षरशः हैदोस मांडल्याने येथील स्थानिक शेतकरी बगायतदार पुरतेच हैराण झाले आहेत. ऐन शिमगोत्सवात गव्या रेड्यांनी हैदोस घालून केळी बागायती व उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने येथील शेतकरी चिंतातुर झाला आहे. 

येथील कापईवाडी परिसरात 10 ते 15 गव्यांचा कळप दिवसाढवळ्या भरवस्तीत शिरत आहे. या गव्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची हानी होत असून याबाबत वनविभाग मात्र निद्रिस्त असल्याचे दिसून येत आहे. केवळ शेती बागायतीची नुकसानी नाही तर हुसकविण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर प्रतिहल्ला करण्यासाठी हे प्राणी धावतात. दुपारपर्यंत मुक्तसंचार करत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास देखील येथे धोका निर्माण झाला आहे. येत्या आठ दिवसांत या गव्यांच्या कळपाचा बंदोबस्त न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earless Boy Hears: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT