कोकण

आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार ऑनलाईन

सकाळ वृत्तसेवा

मुणगे (सिंधुदुर्ग) : वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) (driving license)आता चाचणी दिल्याशिवाय मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर केला आहे. `सारथी (sarthi)४.०` या अद्ययावत प्रणालीद्वारे आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या ऑनलाईन शिकाऊ वाहनचालक परवाना तसेच वाहन नोंदणीच्या ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी नुकतेच केले आहे. याचा फायदा सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यालाही होणार आहे. (get-a-driving-license-online-including-vehicle-registration-kolhapur-news)

वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी आता परिवहन कार्यालयात जाऊन वाहन चालविण्याची चाचणी आता द्यावी लागणार नाही; मात्र त्यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या मान्यता प्राप्त राष्ट्रीय सूचना प्रशिक्षण केंद्रातून वाहन चालविणे शिकावे लागणार आहे. वाहनचालक प्रशिक्षणानंतर एक प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्या आधारे परिवहन कार्यालयात जावून चाचणी द्यावी लागणार नाही. अशा प्रकारचे वाहन चालक राष्ट्रीय सूचना प्रशिक्षण केंद्र आता १ जुलैपासुन सुरू होणार आहे.

अशा प्रकारचे आदेश केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाने निर्गमित केले आहेत. त्या अनुषंगाने राज्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नवीन वाहन नोंदणी व शिकाऊ वाहन चालक प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांचे हस्ते केले आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार परिवहन या संकेतस्थळावर स्वतःचे अर्ज करताना आधार क्रमांक नोंद करणार असून त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता व स्वाक्षरी आधार डेटा बेसमधून परिवहन या संकेतस्थळावर येणार आहे. यामुळे अर्जदाराचे ओळखीची व पत्त्याची वेगळी खातरजमा करण्याची आवश्यकता भासणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT