कोकण

पालकरवाडी ग्रामस्थांचा आज सिंधुदुर्गनगरीत ''घागर मोर्चा''

CD

पालकरवाडी ग्रामस्थांचा आज
सिंधुदुर्गनगरीत ‘घागर मोर्चा’
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ५ः चुकीचे अंदाजपत्र आणि ठेकेदाराच्या कामातील अनियमितपणामुळे पालकरवाडी गावातील जलजीवनचे काम अपूर्ण आहे. पाणीटंचाईमुळे गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पालकरवाडीतील पाण्याचा प्रश्न न सोडविल्यास ६ जूनला पाणीपुरवठा विभाग सिंधुदुर्ग यांच्या कारभाराविरोधात पालकरवाडी येथील महिला व ग्रामस्थ ओरोस मुख्यालय येथे घागर मोर्चा काढणार आहेत, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले की, ठेकेदाराकडून काम अपूर्ण असताना सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बिल ठेकेदाराला अदा केले आहे. याविषयी ग्रामपंचायतीस जाब विचारल्यास याविषयी संबंधित विभागाशी व ठेकेदाराशी वेळोवेळी पत्रव्यवहार व तक्रार केलेली आहे, असे उत्तर दिले. ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभाग हा संबंधित अधिकारी व ठेकेदारांना पाठिशी घालत असून, त्यांच्यावर योग्यप्रकारे कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
पालकरवाडीतील पाण्याचा प्रश्न न मिटल्यास उद्या (ता. ६) घागर मोर्चा काढण्याचा इशारा महिला, ग्रामस्थांनी दिला आहे. निवेदनावर दीपक करंगुटकर, भालचंद्र चिचकर, गुंडू पालकर, आबा येरम, नारायण गावडे, दयानंद येरम, ज्ञानेश्वर लटम, ज्ञानेश्वर परब, आनंद गावडे, भाई परब, लक्ष्मी करंगुटकर, काशीबाई गवंडी, स्वाती गवंडी, वैशाली गवंडी, सुरेश गवंडी, अर्चना गवंडी, रुपाली गवंडी, संगीता राऊळ, राऊळ, श्रीकांत राऊळ, श्रीधर राऊळ, रुपाली धुरी, मिलन राऊळ व इतर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT