Gharda Company Production Affects Due To Corona
Gharda Company Production Affects Due To Corona  
कोकण

चीनचा कच्चा माल बंद झाल्याने `या` कंपनीचे उत्पादन घटले

सकाळवृत्तसेवा

चिपळूण ( रत्नागिरी) - कोरोनाचा परिणाम औद्योगिक क्षेत्रातही जाणवू लागला आहे. खबरदारीची उपायोजना म्हणून लोटेतील सर्वात मोठ्या घरडा कंपनीने कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमला परवानगी दिली आहे. कंपनीत येणाऱ्या 20 टक्के लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे लोटेतील दोन प्रकल्प बंद केले आहेत, अशी माहिती कंपनीचे प्रकल्प प्रमुख आर. सी. कुलकर्णी यांनी दिली. 

ते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कामगारांच्या सुरक्षेसाठी ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या सर्व उपाययोजना आम्ही करत आहोत. केवळ 20 टक्के कामगारच कामावर आहेत. त्यांच्या शरिराचे तापमान आणि इतरही चाचण्या घेतल्या जातात. दिवसातून दोनवेळा कामगारांची तपासणी केली जाते. त्यांना सर्वप्रकारच्या सुविधा पुरविलेल्या आहेत. कंपनीतील सार्वजनिक ठिकाण आणि कॅन्टीनमध्ये चारवेळा फवारणी करून स्वच्छता केली जाते. 

मास्क लावल्याशिवाय आणि सानिटायझरने हात धुतल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. घरडा हॉस्पिटलमध्ये दोन डॉक्‍टर्स आणि 12 नर्स उपलब्ध आहेत. त्यांच्या मार्फत घरडा कॉलनी आणि परिसरात कोरोनाबाबत प्रबोधन केले जात आहे. एखाद्या व्यक्तीला सर्दी, ताप, खोकला आला त्याच्यावर उपचार करण्यासाठी आम्ही स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. प्रशासन विभागासह मार्केटींग, परचेसींग, लेखा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आम्ही घरातून काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. कंत्राटी कामगारांना आम्ही थांबविले आहे. 

घरडा कंपनीसाठी लागणारा कच्चा माल चीनमधून येतो. कोरोनामुळे चीनमधून येणारा कच्चामाल बंद झाला आहे. कंपनीने जे उत्पादन तयार केले आहे ते परदेशात पाठवण्यास अडचणी निर्माण होत आहेत. गुजरातमध्येही शटडाऊन सुरू आहे. त्यामुळे सध्या 30 टक्के उत्पादन सुरू आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर काही दिवस कंपनी बंद ठेवण्याची वेळ येईल. 
- आर. सी. कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख घरडा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT