कोकण

कोकण हापूसला भौगोलिक मानांकन

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा तसेच जवळच्या परिसरातील हापूस आंब्यावर अखेर जीओग्राफिकल इंडिकेशन टॅगची (जीआय टॅग) मोहर उठली आहे. फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याला बौद्धिक संपदा कायद्यांतर्गत भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे. 

जीआय टॅगमुळे कोकणातील हापूस आता आणखी भरारी घेऊ शकेल. कोकणाला याचा आर्थिक फायदाही होणार आहे. जीआय टॅगचे सर्वस्वी अधिकार कोकण कृषी विद्यापीठाच्या नावाने देण्यात आले आहेत. सर्टिफिकेट आणण्यासाठी केकेव्हीचे अधिकारी दिल्लीलाही रवाना झाले आहेत. 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकताच हापूसच्या जीआय टॅगचा लोगो आणि टॅगलाइनचे उद्‌घाटन केले. जीआय टॅगमुळे मूळ उत्पादनाला व त्याच्याशी संबंधित घटकांना योग्य मोबदला मिळण्यास हातभार लागेल. आजवर भारतातील अनेक उत्पादनांना जीआय टॅग मिळाला असून, त्यातून एकप्रकारे उत्पादन प्रक्रियेत सहभागी असलेल्या घटकांना हमीच मिळाली आहे, असे उद्‌गार या वेळी प्रभूंनी काढले.

एखाद्या उत्पादनाचे भौगोलिकदृष्ट्या मूळ स्थान दर्शविण्यासाठी जीआयचा वापर केला जातो. त्यातून संबंधित उत्पादनाच्या दर्जाचेही मापदंड निश्‍चित करण्यात येतात. यापूर्वी दार्जिलिंगचा चहा, महाबळेश्‍वरची स्ट्रॉबेरी, जयपूरची निळी पोटरी, बनारसी साडी, तिरुपतीचे लाडू, कोकम यासह भारतातील ३२५ उत्पादनांना जीआय टॅग मिळाला आहे. 

भौगोलिक परिस्थितीवर आधारित हे मानांकन डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाच्या नावाने मिळाले आहे. यामुळे हापूसला वेगळी ओळख मिळेल.
- आरिफ शहा, 

   जिल्हा कृषी अधिकारी

हापूसची निर्यात वाढणार 
कोकणात पिकणाऱ्या हापूसची युरोप, कोरिया, जपानमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होते. अमेरिका व ऑस्ट्रेलियातही हापूसची निर्यात सुरू झाली आहे. हापूसला सर्वाधिक मागणी संयुक्त अरब अमिरातीतून आहे. या भागात १३ हजार ९८४ टनपैकी ६० टक्के हापूस होतो. हापूसला इंग्लंड, ओमान, कतार, कुवेत, सौदी अरेबिया, कॅनडा, फान्स, सिंगापूर, जर्मनी, बहारीन, हॉगकाँगमधून मागणी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana : घसरगुंडीची सुरुवात माझ्यापासून; स्मृतीने इंग्लंडविरद्धच्या पराभवाची स्वीकारली जबाबदारी

असरानीवर घाईघाईत का करण्यात आले अंत्यसंस्कार? 'ही' होती त्यांची शेवटची इच्छा, मॅनेजरने केला खुलासा

Gadchiroli News: माओवाद्यांची केंद्रीय समिती म्हणाली, भूपती-रूपेश ‘गद्दार’

Gold Rate Today : लक्ष्मीपूजनादिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Mangalvedha News: 'मंगळवेढ्यात काँग्रेसचे पिठले भाकरी आंदोलन'; शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत दिवाळीपूर्वी न मिळाल्याचा निषेध

SCROLL FOR NEXT