a girl fraud from one man in konkan ratnagiri she attends suicide in ratnagiri 
कोकण

तुझ्यावर मी खरे प्रेम करत नाही, असं तो म्हणाला अन् तिने उचलेले धक्कादायक पाऊल

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शरीरसबंध ठेवत अखेर लग्नाला नकार दिल्याने पीडित तरुणीने फिनेल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी संशयित तरुणावर दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला दापोली पोलिसांनी अटक केली. दिनेश सुनील इंदुलकर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

पोलिसानी संशयिताला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित तरुणी व संशयित यांची दीड वर्षापूर्वी मैत्री झाली होती. यानंतर व्हॉट्‌स ॲपच्या माध्यमातून व भेटून ते एकमेकांशी संपर्क साधत होते. जून महिन्यातील एका दिवशी पीडित तरुणी कामावरून घरी येत असता तिला संशयित तरुणाने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास थांबवून तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्याने तिला पाठवलेले सर्व मेसेज डिलीट करून टाकले व तुझ्यावर मी खरे प्रेम करत नाही असे सांगितले.

हा सर्व प्रकार या तरुणीने आपल्या भावाला व वडिलांना सांगितला. त्यानंतर २७ नोव्हेंबरला ११ वाजता बुरोंडी येथे संशयित दिनेश सुनील इंदुलकर याच्या व या तरुणीच्या समाजातील लोकांची बैठक पार पडली. त्यात संशयित दिनेश याने या मुलीशी आपल्याला लग्न करायचे आहे की नाही ते चार दिवसात सांगतो, असे सांगितले. त्यानंतर २९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा मीटिंग घेण्यात आली व यामध्ये संशयित दिनेशने आपण या मुलीशी लग्न करणार नाही, असे सांगितले. 

या गोष्टीचा धसका या तरुणीने घेऊन रागाच्या भरात ३० नोव्हेंबरला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरातील फिनेल प्राशन केले. त्याचा त्रास तिला झाल्याने अखेर तिला उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या तरुणीच्या तक्रारीनुसार संशयित दिनेश इंदुलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला दापोली पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पूजा हिरेमठ करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT