give fraud permission pass for people fine Criminal charges 
कोकण

सावधान ! खोटा पासधारक आढळल्यास होणार ही कारवाई....

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग) : मुंबई, पुणेसह  राज्याच्या विविध भागातून चाकरमानी वेगवेगळ्या कारणांनी पासेस घेऊन गावांमध्ये दाखल होत आहेत. मात्र काहींनी चुकीची  कारणे देत पासेस घेतल्याचे निदर्शनास आले आहे. या अनुषंगाने तालुक्यात आलेल्या पासधारकांची पडताळणी करून खोटी माहिती देऊन आलेल्या संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा पंचायत समिती प्रशासनाने दिला आहे. याबाबतचे परिपत्रक कार्यवाहीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना पाठविले आहे. 


गटविकास अधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, ७ मे पासून राज्यातून व राज्याबाहेरून येणाऱ्या लोकांची संस्थात्मक विलगीकरण करण्याची व्यवस्था ग्रामपंचायत स्तरावर स्थापित ग्राम नियंत्रण समितीने केली आहे. जे लोक परजिल्ह्यातून व परराज्यातून येत आहेत, त्यांना ग्रामपंचायत स्तरावर स्थापित संस्थात्मक विलगीकरण अथवा गृह विलीगीकरण मध्ये ठेवले जात आहे. परंतु शासनाने उपलब्ध केलेल्या वैधमार्गाने येत असलेल्या व्यक्तींनी प्रवेश मिळवण्यासाठी जे कारण नमूद केले जाते, त्यामध्ये तफावत असल्याची बाब काही ठिकाणी सरपंच तसेच समिती सदस्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. 

हेही वाचा- तुम्हाला सतत तहान लागते का ...? मग वाचाच                                                                                           त्यामुळे अशा व्यक्तीवर कोणती कारवाई करावी ? अशी विचारणा सरपंचांकडून होत आहे. त्यानुसार जे लोक परजिल्ह्यातील व परराज्यातून शासनाने अधिकृत केलेला प्रवेश पास घेऊन जिल्ह्यात तसेच त्यानंतर संबंधित ग्रामपंचायत स्तरावर विलगीकरण करण्यासाठी पाठविले जातात, त्यांच्या पासेसची पडताळणी करण्यात यावी. त्याने नमूद केलेले कारण है वैध आहे का, याची खात्री करावी व दिलेले कारण हे समितीतीस योग्य आहे कि अयोग्य याबाबत निर्णय घेऊन अशा व्यक्ती बाबत शासनाची फसवणूक केल्याबाबत समितीचे मत झाल्यास नियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: शशांक सिंगने दोन सोपे झेल टाकले; अर्शदीप भडकला, पाँटिंग तापला... श्रेयस अय्यरने काय केले ते पाहा Video Viral

तन्वी कोलते ठरली 'Bigg Boss Marathi 6' ची महाविजेती, राकेशचं स्वप्न राहिलं अपूरं

IPL 2026 Point Table: अपराजित पंजाब किंग्स! अव्वल स्थानावरील पकड मजबूत; लखनौ सुपर जायंट्सची अवस्था काय? पाहा गुणतालिका

US-Iran War: डील करा नाहीतर...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, संघर्षात निर्णायक टप्पा जवळ?

Akshaya Tritiya Gold Price : अक्षय तृतीयेला सोन्याच्या भावाने गाठला उच्चांक, खरेदीही मोठ्या उत्साहात; २०,००० कोटींच्या विक्रीचा अंदाज

SCROLL FOR NEXT