The goddess Shri Devi Souljai fifth anniversary in devrukha kokan marathi news 
कोकण

पंधरा हजार नागरिकांनी अनुभवले 'हे' ४२ चित्ररथ...

प्रमोद हर्डीकर

साडवली (रत्नागिरी) : देवरुख शहराची ग्रामदेवता श्री देवी सोळजाई मंदिर देवस्थानचा जीर्णोद्धार पाचवा वर्धापन दिन दोन दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा झाला.शनिवारी देवी यज्ञ झाला व रविवारी सकाळी शहरातील ४२ वाड्यांमधील पंधरा हजार नागरिकांनी शहरातुन शोभायाञा काढली. देवी सोळजाईची प्रतिमा रथात ठेवून शोभायाञा काढण्यात आली.
या शोभायाञेत ४२ चिञरथ सामिल झाले.

धार्मिक,पौराणिक,ऐतिहासिक,आधुनिक,पर्यावरण आदि विविध विषयांवर जिवंत देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले.जवळपास तीन कि.मी.चा हा प्रवास झाला.लेझिम,झांजपथक,ढोल,ताशे यांचा दणदणाट शोभायाञेत पहायला मिळाला.शिस्तबद्घ व एकोपा,सामाजिक बांधिलकी जपणारी अशी ही शोभा याञा झाली.देवी सोळजाईच्या या शोभायाञेत मशिदीजवळ मुस्लीम बांधवांनी भाविकांना लाडु वाटप करुन सर्व धर्म समभाव उक्तीची प्रचिती दाखवून दिली.या भुमिकेचे भाविकांनी स्वागत केले.

मंडळांचा सहभाग उत्स्फूर्त..

मधली आळी बाजारपेठ संकल्प मिञमंडळाने यावर्षी चौका चौकात स्वागत कमान्या उभारल्या होत्या.गुढ्या, तोरणे उभारुन पताकांनी परीसर सजवला होता.सोळजाई देवी रथावर पुष्पवृष्टी केली व भाविकांना सरबत वाटप केले.ही बाब भाविकांना चांगली भावली.ठिकठिकाणी विविध संस्था ,मंडळांनी पाणी व सरबत वाटप केले.

सर्व धर्म समभावाचा संदेश
या शोभायाञेत खालची आळी जय हनुमान प्रासादिक मिञमंडळाच्या कार्यकर्त्यांनी शोभायाञेत पाठी शेवट राहून सर्व मार्गावरील कचरा गोळा केला.यासाठी त्यांनी वेगळी गाडी सोबत ठेवली होती.पाणी,सरबताची ग्लासे व इतर खाद्यपदार्थांच्या रॅपरचा कचरा या मंडळाने उचलुन चांगले अभियान राबवले.देवस्थानचे अध्यक्ष बापु गांधी यांनी सर्व भाविकांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

Ganpati Visarjan Rally : विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण करणार! पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांची ग्वाही

Latest Maharashtra News Updates Live: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Ganpati Visarjan : गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; तीन हजार ९५९ मंडळांच्या गणपतींचे होणार विसर्जन

SCROLL FOR NEXT