Good fish found in Malvan konkan sindhudurg 
कोकण

मत्स्यखवय्यांचा आनंद शिगेला! श्रावण संपताच मासळीची बंपर कॅच

प्रशांत हिंदळेकर

मालवण (सिंधुदुर्ग) - येथील किनारपट्टी भागात गेले दोन दिवस मोरी मासळीची चांगली बंपर कॅच मिळाली. श्रावण संपल्याने मोरी मासळीच्या खरेदीसाठी मत्स्यखवय्यांनी आज समुद्रकिनारी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात 250 रुपये किलो मोरीचा दर 300 रुपयांपर्यंत वधारला होता. 
गतवर्षीच्या मासेमारी हंगामात म्हणावी तशी मासळीची पकड मिळाली नाही. त्यामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली.

पर्ससीन, हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी, एलईडीची विध्वंसकारी मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांच्या जाळ्यात मासळीच मिळत नव्हती. कोरोनाच्या संकटाचा फटका मासेमारी हंगामास बसल्याचे दिसून आले. कोरोनामुळे आर्थिक घडी बिघडल्याने मच्छीमारांच्या चिंतेत आणखीनच वाढ झाल्याचे दिसून आले. नव्या मासेमारी हंगामाची दमदार सुरवात होईल, अशी अपेक्षा मच्छीमार बाळगून होते.

1 ऑगस्टपासून मासेमारी हंगामास सुरवात झाली; मात्र वादळी वारे, अतिवृष्टीमुळे मासेमारीस सुरवात झाली नाही. मात्र गेल्या काही दिवसात स्थानिक मच्छीमारांना बांगडा, पेडवे, पापलेट, मोरी यासारखी किरकोळ मासळीचे उत्पन्न मिळत होते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी मासळीची चांगली कॅच मिळेल अशी मच्छीमारांना आशा होती. यातच गेल्या दोन दिवसात मच्छीमारांना मोरी मासळीची मोठी कॅच मिळाल्याने त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. मोरीची आवक वाढल्याने 500 ते 550 रुपये किलो दराने मिळणाऱ्या मोरीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले. 

श्रावण संपल्याने... 
श्रावण संपल्याने येत्या गणेशोत्सवापूर्वी मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी मत्स्यखवय्यांनी आज समुद्रकिनारी गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळी 250 रुपये किलो मोरीचा दर 300 रुपये किलोपर्यंत वधारल्याचे दिसून आले. सध्या पर्यटन व्यवसाय बंद असल्याने मासळीची मागणी म्हणावी तशी नाही. त्यामुळे दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. मासळीची चांगली कॅच मिळाल्याने मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे दिसून आले. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

War Impact on India: पश्चिम आशियातील संघर्ष भारताला किती महाग पडणार? तेल, महागाई, रुपया आणि शेअर बाजारावर वाढला दबाव

IPL 2026: आनंद गगनात मावेना... पाटिदारसह, विराटने धरला ठेका, ढोलच्या गजरात बंगळुरूच्या खेळाडूंचा धुमाकूळ; RCB ने शेअर केला भारी Video

त्या फोटोमध्ये पूजा भट्ट खरंच न्यूड होती का? अखेर अभिनेत्रीने दिली कबुली; म्हणाली, 'मी खरंच इनरवेअर...'

Mumbai-Goa Highway: खारपाडा येथील टोलनाका बंद पाडला, जनआक्रोश समिती आक्रमक; आधी कामे पूर्ण करण्याची मागणी

Latest Marathi News Update : लातूरमध्ये गॅस सिलेंडरसाठी पुन्हा रांगा; ऑनलाइन बुकिंगनंतरही ग्राहकांची फरफट

SCROLL FOR NEXT