good news for fishermen return on diesel in sindhudurg malvan
good news for fishermen return on diesel in sindhudurg malvan 
कोकण

मच्छीमारांसाठी खुशखबर ; आता डिझेलवरील परतावा मिळणार

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग) : डिझेल परताव्यासाठी २०२०-२१ या वर्षासाठी केलेल्या तरतुदीपैकी उर्वरित ४०.६५ कोटी रुपयांची रक्कम लवकरात लवकर मत्स्य व्यवसाय विभागास देण्याची मागणी मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. अर्थमंत्र्यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम विभागास वितरित करण्याचे निर्देश संबंधित सचिवांना दिले असल्याची माहिती मत्स्य व्यवसायमंत्री शेख यांनी दिली.

२०२० व २०२१ या आर्थिक वर्षामध्ये डिझेल परताव्यासाठी ६० कोटींची तरतूद केली होती; परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यातील फक्त १९.३५ कोटी रुपये रक्कमच मत्स्यव्यवसाय विभागाला वितरीत करण्यात आली. उर्वरित ४०.६५ कोटी रुपये लवकरात लवकर मत्स्य व्यवसाय विभागास वितरित करण्याची मागणी राज्याचे मत्स्य व्यवसायमंत्री शेख यांनी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

डिझेल परताव्याची उर्वरित रक्कम विशेष बाब म्हणून मत्स्यव्यवसाय विभागास तात्काळ वितरीत करण्याचे निर्देश यावेळी अर्थमंत्र्यांनी वित्त सचिवांना दिले असल्याची माहिती मत्स्य व्यवसायमंत्री शेख यांनी दिली आहे. शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही काळापासून डिझेल परताव्याचा अनुशेष वाढत गेला. हा अनुशेष भरून काढत आतापर्यंत ११० कोटी रुपयापर्यंत डिझेल परतावा मच्छीमारांना दिला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे डिझेल परताव्यासाठीची १८९ कोटींची पूरक मागणी करण्यात आलेली असून या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद अर्थमंत्र्यांनी दिला आहे. महाराष्ट्रात सध्या १६० मच्छीमार सहकारी संस्थांच्या नऊ हजार ६४६ यांत्रिकी नौकांना डिझेल कोटा मंजूर केलेला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

SCROLL FOR NEXT