Google track driver knife attack in sindhudurg 
कोकण

पैशाची व मोबाईलची मागणी करत ट्रक चालकावर चाकूने केला हल्ला

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : कोल्हापूर येथून मार्बल फरशी घेऊन  शहरात आलेल्या एका ट्रक चालकावर पैशासाठी चाकूने हल्ला केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.  हा चालक जिमखाना मैदान समोरील डॉ. स्वार यांच्या हॉस्पिटल समोर ट्रक मध्ये बेशुद्धावस्थेत पडलेला होता. लोकांना संशय आल्याने ट्रकचा दरवाजा उघडून पाहिले असता रक्तबंबाळ स्थितीत ड्रायव्हर आढळून आला. पोलिसांना याबाबत माहिती  देऊन तात्काळ त्याला कुटिर रुग्णालयात हलविले. 


चालकाचे नाव अजयकुमार श्रीपतराव पाटील (वय 40. हाडोळी कोल्हापूर)  असे असून हा प्रकार आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारानंतर त्याला गोवा बांबुळी येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.


 येथील जिमखाना मैदान परिसरात पार्किंगच्या जागेत एक मधोमध गाडी लावण्यात आली होती. काही लोकांना संशय आल्याने या ट्रकमध्ये पाहणी केली असता एक युवक गंभीर जखमी अवस्थेत रक्तबंबाळ स्थितीत  बेशुद्धावस्थेत होता. त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यासाठी ॲम्बुलन्स बोलविण्यात आली होती. मात्र ती न आल्यामुळे अखेर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आपल्या गाडीतून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
   मिळालेल्या माहितीनुसार ट्रक चालकाजवळ रात्री 3 वाजता काही लोकांनी गाडी थांबून पैशाची व मोबाईलची मागणी केली. ते न दिल्यामुळे दोघांनी चाकूने वार केल्याची  माहिती पुढे येत आहे. याबाबत येथील पोलीस अधिक तपास करीत आहेत.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT