Govalkot Madrasa will be the quarantine center 
कोकण

गोवळकोट मदरसा होणार क्वारंटाईन सेंटर...

मुझफ्फर खान

चिपळूण - गोवळकोट येथील दारूल उलुम कुरान मदरसामध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. येथे संदिग्ध कोरोना रूग्णांवर उपचार केले जाणार आहे. कोविड-19 या जागतिक महामारीमुळे जगासह भारत देशही अडचणीत आला आहे. अशा या कठीण प्रसंगी प्रशासनाला मदत करण्यासाठी गोवळकोट येथील दारूल उलुम कुरान मदरसाचे ट्रस्टी सरसावल्याने प्रशासनाला अधिक बळ येणार आहे. 

चिपळूण तालुक्यात पेढांबे येथील मंदार एज्युकेशन सोसायटीची इमारत आणि कामथे येथील उपजिल्हा रूग्णालयात क्वॉरंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. पाच महिन्यात कोरोनाचे जेवढे संदिग्ध रूग्ण सापडले यातील सर्वाधिक रूग्णांवर या दोन क्वांरटाईन सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. कामथे उपजिल्हा रूग्णालयात अनेक गैरसोयी होत्या त्यामुळे तेथील डॉक्टरांना कोरोना रूग्णांवर उपचार करताना अडचणी येत होत्या. चिपळूण तालुका मुस्लीम समाज संघटनेने सुमारे दहा लाख रुपये खर्च करून येथे आयसीयु आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या. जुलैमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कोरोना बाधीत आणि संदिग्ध रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पेढांबे आणि कामथे येथील क्वांरटाईनची इमारत रूग्णांसाठी कमी पडत आहे.

कोरोनाची वाढती व्याप्ती लक्षात घेता गोवळकोट येथील दारूल उलुम मदरशाची जागा संदिग्ध रूग्णांच्या क्वारंटाईन करण्यासाठी प्रशासनाला देण्याची तयारी व्यवस्थापनाने दर्शवली आहे. मदरसा येथील जागा शैक्षणिक सुविधा पूर्ववत सुरू होईपर्यंत कोविड सेंटरसाठी देण्यात येणार आहे. येथील वीज, पंखे, स्वच्छतागृह, पार्किंग सुविधाही उपलब्ध करून देण्याची तयारी व्यवस्थापनाने दाखविली आहे. येथील महसूल प्रशासन व आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी मदरशाची पाहणी केल्यानंतर मदरसाच्या ट्रस्टीने संपूर्ण इमारतीची स्वच्छता करून घेतली आहे. दोन दिवसात येथे क्वारंटाईन सेंटर सुरू करून संदिग्ध रूग्णांवर उपचार केले जाणार आहे. 
 

कोरोनाच्या फैलाव रोखण्यासाठी प्रशासन दिवसरात्र प्रयत्न करत आहे. संदिग्ध रूग्ण वाढत असल्याने त्यांना क्वारंटाईन कुठे करावे असा प्रश्‍न प्रशासनासमोर असताना आम्ही गोवळकोट येथील मदरशाची इमारत क्वारंटाईन सेंटरसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून परवानगी मिळाली तर आम्ही काही कर्मचारी तेथे ठेवू. ते रूग्णांना अल्प दरात चहा, नाष्टा आणि जेवणाची व्यवस्था करून देतील. पोलिस बंदोबस्त आणि शासकिय कर्मचार्‍यांची व्यवस्था  प्रशासनाने करावी. 

- अखलाक मयेर, सामाजिक कार्यकर्ते गोवळकोट

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी निवडून आलोय, आत जाऊ द्या!'' फरशी कारागीराला पोलिसांनी बाहेरच अडवलं; माजी उपनगराध्यक्षाचा केला पराभव

Solapur Cyber Crime : आरटीओ ई-चलानच्या नावाखाली मोबाईल हॅक; ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

Karad Krushi Pradarshan : एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी आर्थिक सक्षम होणार; कऱ्हाड कृषी प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास!

SCROLL FOR NEXT