government engineering college budget rupees 152 in konkan side uday samant 
कोकण

कोकणात होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय : उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : येथे येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०२१-२२) ३०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असलेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कोकणातून दर्जेदार अभियंते तयार होतील, असा आत्मविश्‍वास उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.

मंत्री सामंत म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाविकास आघाडी सरकारने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून रत्नागिरी  येथे १५२.५३ कोटी खर्च करून ३०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमतेचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅट्रानिक्‍स इंजिनिअरिंग, सिव्हिल व इन्फास्ट्रक्‍चर इंजिनिअरिंग, आर्टिफिशिअल इंटेलिजंन्स व डेटा सायन्स, इलेक्‍ट्रिकल इंजिनिअरिंग आणि फूड टेक्‍नॉलॉजी व मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.’’

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. सध्याच्या काळाशी सुसंगत असे अभ्यासक्रम यामध्ये असल्याकारणाने विद्यार्थ्यांना आपल्या क्षमतांना न्याय देता येणार आहे. विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी जागतिक स्पर्धेत सहभागी होऊ शकतील, असे सांगून विशेषतः शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आपल्या भागात सुरू होत असल्याची कोकणवासीयांना आनंदाची बातमी देताना मलाही आनंद होत आहे, अशी भावना  सामंत यांनी व्यक्त केल्या.
 

विशेष तपशील

  •  शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून सुरवात
  •  मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी 
  •  १५२.४२ कोटींची तरतूद
  •  तीनशे विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: पुढच्या आठवड्यात बँका कधी सुरू, कधी बंद? अनंत चतुर्दशीला बँकाना सुट्टी? पाहा पूर्ण अपडेट

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Ganeshotsav Nigeria: सातारच्या सुपुत्राने नायजेरियात रुजवली गणेशोत्सवाची परंपरा; १६ वर्षांपासून लागोसमध्ये बाप्पाचा जयघोष, सातासमुद्रापार मराठी मातीचा सुगंध

Latest Marathi News Update : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल

SCROLL FOR NEXT