government hospital of sawantwadi not working done the criticised by parab in sindhudurg he locked the hospital for today 
कोकण

सावंतवाडीत नगरपालिकेच्या दवाखान्याला नगराध्यक्षांनीच ठोकले ताळे

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : सावंतवाडी येथील नगरपालिकेच्या भगवान महावीर आयुर्वेदिक व टीबी दवाखान्याला आज खुद्द नगराध्यक्ष संजू परब यांनी टाळे ठोकले. कार्यालयीन वेळेत त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नसल्याने आणि दवाखान्याच्या बाहेर खेडेगावातील वृद्ध रुग्णांची होत असलेली परवड लक्षात घेत त्यांनी हा प्रकार केला. त्यानंतर तब्बल दोन तासानंतर दवाखाना पुन्हा सुरू करण्यात आला.

येथील पालिकेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहाबाहेर पालिकेच्या माध्यमातून भगवान महावीर आयुर्वेदिक व टी. बी दवाखाना सुरू आहे. या दवाखान्यामध्ये दोन कर्मचारी आणि डॉक्टर उमेश मसुरकर यांची नेमणूक करण्यात आली. कार्यालयीन वेळेनुसार सकाळी साडेनऊ ते दुपारी एक व दुपारी दोन ते सायंकाळी पावणे सहा असा दवाखाना सुरू असतो. मात्र गेले कित्येक दिवस दवाखान्यातील डॉक्टर उमेश मसुरकर यांच्याबाबत नागरिकांच्या तक्रारी नगराध्यक्ष संजय परब यांच्याकडे आल्या होत्या.

डॉक्टर उमेश मसुरकर हे कार्यालय वेळेनुसार दवाखान्यामध्ये आजार नसतात, त्यामुळे रुग्णांची परवड होत असल्याच्या तक्रारी होत्या. आज सकाळी साडेनऊ वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृहामध्ये भाजपाच्या शहर मंडलाचा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष हजर झाले होते. यावेळी त्याने प्रत्यक्षात दवाखान्याला भेट देत पाहणी केली. या पाहणीमध्ये नागरिकांच्या तक्रारी प्रमाणे डॉक्टर वेळेत दवाखान्यात हजर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

बाहेर रुग्ण ताटकळत असतानाही डॉक्टर वेळेत हजर नसल्याने नगराध्यक्ष संजू परब यांचा पारा चढला. आणि त्यांनी  थेट दवाखान्याला टाळे ठोकत त्याची चावी थेट मुख्याधिकाऱ्यांकडे नेऊन दिली. यामुळे काही काळ वातावरण तंग झाले. दरम्यान तब्बल दोन तासानंतर दवाखाना पुन्हा उघडण्यात आला. यावर नगराध्यक्ष परब म्हणाले, डॉक्टर उमेश मसुरकर यांचे बाबत असलेल्या तक्रारी लक्षात घेता, आज त्याची वस्तुस्थिती समोर आली. अजूनही डॉक्टरांबद्दल अनेक तक्रारी असून याबाबत आपण जातीनिशी लक्ष घालणार आहे. खेडेगावातून येणाऱ्या व शहरातील रुग्णांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी यापुढे कौन्सिल बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार आहे. 

तर डॉ. उमेश मसूरकर यांना यावर विचारले असता, सकाळी साडेनऊ वाजता दवाखाना उघडल्यानंतर साफसफाई तसेच आदल्या दिवशी झालेल्या केस पेपरचे चलन करून सदर चलन पालिकेमध्ये निवांत भरावे लागते. या काळात काही पेशंटचे नातेवाईक केस पेपर काढून निघून जातात. आपण दर दिवशी साडेदहा वाजता दवाखान्यात येतो व त्यानंतर पेशंट संपेपर्यंत आपण रुग्णसेवा देतो. यावेळी आपण कुठलीही कार्यालयीन वेळ पाहत नाही. सायंकाळी सुद्धा आपण रुग्ण संपेपर्यंत सेवा देतो, असे सांगून जास्त बोलण्याचे टाळले.

डॉक्टरचा थंब शिपायाकडून

नगराध्यक्ष संजू परब यांनी डॉक्टर उमेश मसुरकर यांच्यावर आरोप करताना काळाच्या अगोदर डॉक्टरचा थंब खुद्द शिपायाकडून लावण्यात येत होते. यासाठी वेगळी सिस्टीम करण्यात आली होती, याबाबत आपणाकडे तक्रारी होत्या याचीही आपण खात्री करणार आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah Rukh Khan FDA Notice : तुकाराम मुंढे शाहरुख खानवर कारवाई करणार? FDA च्या नोटीसीला उत्तर न दिल्याने पुढील प्रक्रिया सुरू

6:30 वाजता WFH करण्यास सांगितलं, 9:30 वाजता Google Meetची लिंक आली अन् अवघ्या 5 मिनिटांत 80 जणांची नोकरी गेली; नक्की काय घडलं?

अकरावीत आईला म्हणाल्या मला रुचीरशीच लग्न करायचंय! मृणाल कुलकर्णी यांनी प्रेमासाठी केलेली बंडखोरी, अशी खुललेली लव्हस्टोरी

Ladki Bahin Yojana Latest Update : 1 कोटी 66 लाख महिलांची प्रतीक्षा संपणार! लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार

Latest Marathi News Update : अखेर भुलेश्वर राजाची मुर्ती पुन्हा विराजमान, कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT