Government orders Working from home for 55 year old and sick teachers 
कोकण

शाळा सुरू करण्याबाबत शासनाचे आदेश ; या शिक्षकांना मिळणार वर्क फ्रॉम होमच....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरीत : कोरोना टाळेबंदी शिशिल झाल्यानंतर शैक्षणिक वर्षाला सुरवात होणार असून, शिक्षकांना आठवड्यातून दोन वेळाच शाळेत बोलवता येणार आहे. उर्वरित दिवशी शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करावे. मात्र, गंभीर आजारी आणि 55 वर्षांवरील शिक्षकांनी प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत घरूनच काम करावे, अशा सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या. त्यामुळे मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा लागेल. 


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने शैक्षणिक सत्र वेळेवर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. राज्यातील मंबुई, ठाणे, नवी मंबुई, पालघर जिल्ह्यांतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यावश्‍यक सेवांसाठीच सुरू केल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्यात अडचणी निमाण होऊ शकतील. ही बाब विचारात घेऊन शिक्षकांसाठी वर्क फ्रॉम होमची सवलत दिली आहे.

आठवड्यातून दोन वेळाच शिक्षकांना बोलवा ​

शाळा सुरू करण्याची तयारी आणि ई लर्निंगबाबत मुख्याध्यापकांनी आठवड्यातून दोन दिवस बोलविल्यास शिक्षकांना उपस्थित राहावे लागेल. महिला शिक्षिका, गंभीर आजार असलेल्या आणि 55 वर्षांवरील पुरुष शिक्षकांना शाळेत न बोलविता त्यांना प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याच्या कालावधीपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वर्क फ्रॉम होमची सवलत आहे. 
ज्या शिक्षकांची शाळेत उपस्थिती अत्यावश्‍यक असेल त्याचा निर्णय मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यावयाचा आहे.

शिक्षकांना शक्‍यतो आठवडयात एक किंवा दोन दिवसांपेक्षा जास्त वेळा बोलवू नये. ज्या शिक्षकांच्या सेवा कोविडसंबंधी कामकाजासाठी अधिग्रहीत केलेल्या आहेत, त्यांना कार्यमुक्त करण्याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेवर सर्वाधिक भर देण्याच्या सूचना आहेत. ज्या ठिकाणी शाळा क्वारंटाईनसाठी प्रशासनाने ताब्यात घेतल्या असतील, त्या शाळा मुख्याध्यापकांच्या ताब्यात येईपर्यंत कोणत्याही शिक्षकांना शाळेत बोलावू नये. शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षणाचे नियोजन करावे. या पत्रानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार जिल्ह्यातील शाळा सुरू करणे किंवा शिक्षकांना शाळेत बोलावणे याबाबत सूचना दिल्या आहेत. त्याचे योग्य पद्धतीने शाळांनी पालन करावे. 
-निशा वाघमोडे, शिक्षणाधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

Nagpur Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाने चक्क SBI बँक लुटली, ४.५३ लाखांसह पोलिसांच्या ताब्यात

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Maratha Reservation: मनाेज जरांगे-पाटलांच्या उपोषणाला जुन्नरमधून पाठिंबा; आळेफाट्यावर मराठा समाजाचा रास्ता रोको, मुंबईकडे कूच करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT