A government pass has been given to certain vehicles for transporting mangoes to Mumbai 
कोकण

आंब्याच्या गाडी बसुन मुंबईतील चारकमानी थेट कोकणात... 

सकाळवृत्तसेवा

वेंगुर्ले - मुंबईला आंबा वाहतुक करण्यासाठी ठराविक वाहनांना शासकीय पास देण्यात आला आहे. या गाडीमधून चालकाने परत येताना मुंबईतून आपले नातेवाईक किंवा अन्य व्यक्ती घेऊन येण्यास बंदी आहे. मात्र वेंगुर्ल्यात आंबा वहातूक वाहनातून दोघांना आणल्याचा प्रकार घडल्याची जोरदार चर्चा आहे. त्या अनुषंगाने त्या चालकाचा व आलेल्या चाकरमान्यांचा शोध पोलीस यंत्रणेने सुरु केला आहे.

सध्या देशात कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. असे असताना जीवनावश्यक वस्तू बाजारात ठराविक वेळेत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंब्याचा हंगाम सुरु असल्याने आपला आंबा जिल्ह्यातुन मुंबईत नेण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी बागायतदारांकडून होत होती. त्याचा विचार करुन शासनाने आंबा वाहतुकीसाठी परवानगी देऊन वाहतूक करणा-या गाड्यांना शासकीय पास देण्यात आले आहेत.

बागायतदारांनी आपल्या नेमलेल्या गाडीतून आपला आंबा मुंबई बाजारात पाठवायचा आणि पुन्हा येताना रिकामी गाडी माघारी आणायची. मात्र या गाडीतून सध्याची परिस्थिती पाहता व लॉकडाऊन लक्षात घेता कोणतीही प्रवासी वाहतूक करता नये. त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांना आणण्यासही बंदी आहे. असे असताना वेंगुर्ला येथून मुंबईला गेलेल्या एका गाडीतून माघारी येताना चालकाने आपले नातेवाईक मागील बाजूला बसवून आणले असल्याची पुढे आले आहे. काही जागरुक नागरीकांकडून या शहरात नाक्यानाक्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. ही बाब वेंगुर्ला तहसिल प्रशासनाच्या कानावर आल्याने त्यांचा शोध घेऊन त्याबाबतचा अहवाल तात्काळ देण्याचे आदेश तहसिलदार यांनी पोलीस स्टेशनला दिले आहेत.

 दरम्यान, या बाबत पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांचेशी संपर्क साधला त्यांच्याकडून या बाबतची खातरजमा सुरू आहे. जे लोक आले असतील त्या संबधितांकडून संपूर्ण माहिती घेण्याबरोबरच त्यांची वैद्यिकय तपासणीही करून घेण्यात येईल असे स्पष्ट केले. तसेच अशाप्रकारे बेजबाबदार वागणा-या चालकावर व आंबा आणि भाजी वाहतूक वाहन पास घेणा-यावर सिंधुदुर्गचे आर.टी.ओ. व वेंगुर्ला तहसिलदार यांच्याकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

Coastal Road Accident: BMW फ्लायओव्हरवरून खाली कशी कोसळली? धक्कादायक घटनेचा CCTV व्हायरल

UPI Transaction Fee : ऑनलाइन व्यवहारांना लागणार ब्रेक? केंद्र सरकारच्या निर्णयामुळं शेतकऱ्यांना बसणार लाखो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड, UPI शुल्क बदलामुळं वाढली चिंता

SMRITI MANDHANA: सुजी बेट्सला मागे टाकलं अन् स्मृती मंधानाने रचला इतिहास! महिला T20I मध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली

Vastu Benefits of Shankh: घरात शंख ठेवण्याचे 'हे' आहेत फायदे; वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या शंखाचा योग्य प्रकार अन् दिशा!

SCROLL FOR NEXT