Government should bear the burden of electricity bill Sarpanch demand 
कोकण

शासनानेच वीजबिलांचा भार उचलावा - सरपंचांची मागणी 

सकाळवृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतीची करवसुली शंभर टक्के झालेली नाही. ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि नियमित इतर आवश्‍यक खर्चासाठी ग्रामनिधी पुरेसा नाही. शाळा, अंगणवाड्यांची बिले ग्रामपंचायतींनी भरावीत, असा निर्णय जिल्हा परिषद स्थायी समितीने घेतला असला तरी ग्रामपंचायतींकडे पैसे आहेत कोठे, असा सवाल करत ही बिले भरण्यास ग्रामपंचायतीनी नकार दिला आहे. शासनानेच वीजबिलोपाटीची रक्कम शाळा, तसेच अंगणवाडीच्या वीजबिलांचा भार उचलायला हवा, अशी मागणी केली आहे. 

वीरच्या सरपंच श्रेया वीरकर यांनी सांगितले, प्रत्येक गावात दोन - चार अंगणवाड्या आणि जिल्हा परिषदेच्याही तितक्‍याच शाळा आहेत. वर्षभर ही बिले रखडलेली आहेत. शाळा, अंगणवाड्यांची बिले भरण्यास पदाधिकाऱ्यांची इच्छा असली तरी ग्रामपंचायतीकडे तितकासा निधी शिल्लक नाही. थकित हजारो रुपयांची बिले भरल्यास ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास ग्रामपंचायतीकडे पैसा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे शासनानेच वीजबिलोपाटीची रक्कम शाळा, तसेच अंगणवाडीच्या वीजबिलांचा भार उचलायला हवा. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतीची करवसुली शंभर टक्के झालेली नाही. ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि नियमित इतर आवश्‍यक खर्चासाठी ग्रामनिधी पुरेसा नाही. त्यामुळे शाळा, अंगणवाड्यांची वीज बिले भरणे ग्रामपंचायतींना कठीण होत आहे. शासनाने शाळा, अंगणवाड्यांच्या वीजबिलासाठी निधीच्या स्वरूपात तरतूद करायला हवी. 
- प्रकाश चिपळूणकर, सरपंच, नागावे 

शाळा, अंगणवाड्यांना पब्लिक सर्व्हिस म्हणून आकारणी केली जाते. सर्वच शासकीय कार्यालये व रुग्णालयांना हा नियम गेल्या काही वर्षापासून आकारला जात आहे. शाळांची वीजबिले रखडली तरी त्यांचा पुरवठा खंडित झालेला नाही. 
- कैलास लवेकर, उपकार्यकारी अभियंता, चिपळूण विभाग 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI व्यवहारांवर MDR चार्ज लावण्याच्या निर्णयानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी! कारण काय?

गोकुळच्या 25 जागांसाठी रणसंग्राम! महायुतीत धुसफूस, मुश्रीफांचा भाजपला इशारा?

गेल्यावेळी मुंबईत धिंगाणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

SCROLL FOR NEXT