कोकण

काजूला हमीभावासाठी सरकार लवकरच समिती नेमणार

अनिकेत जामसंडेकर

खारेपाटण (जि. सिंधुदुर्ग) : काजू बियांचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीत आहेत. मात्र, हमीभाव देण्याची बाब विचाराधीन आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांत समिती स्थापना होईल. समितीच्या अहवालानंतर काजूला हमीभाव देण्याबाबत कार्यवाही करू, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी गुरूवारी दिली. 

भुसे यांनी खारेपाटण-चिंचवली गावात येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर प्रगतशील शेतकरी अनिल पेडणेकर यांच्या निवासस्थानी शेतकऱ्यांची छोटी सभा घेतली. त्यात शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, चिंचवली सरपंच रूची भालेकर, उपसरपंच अनिल पेडणेकर, विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाले, जिल्हा कृषी अधीक्षक एम. एन. म्हेत्रे, उपविभागीय कृषी अधिकारी एस. एस. हजारे, मंडल कृषी अधिकारी डी. एम. तोरणे आदींसह शेतकरी उपस्थित होते. 

भुसे म्हणाले, "कोरोना निर्बंधामध्ये शेतमाल वाहतूक, विक्री आदींना सूट आहे. तरीही निर्बंधांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे पिकेल ते विकेल योजनेंतर्गत शेतमालाची थेट बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी राज्य शासन सुविधा उपलब्ध करून देत आहे. शेतकऱ्यांनीही ज्या पिकांची बाजारपेठेत मागणी आहे, ती पिके प्राधान्याने घ्यावीत जेणेकरून उत्पादनांना चांगला दर मिळेल.'' 

सतीश सावंत म्हणाले, "जिल्ह्यात बागायतींना वणवे लागून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागते. यात काजू, आंबा बागायतींच्या होणाऱ्या नुकसानीचे मूल्यांकन कृषी विभागामार्फत व्हायला हवे. कृषी योजना व इतर लाभासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना चाळीस-पन्नास किलोमीटरवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावे लागतात. हे सर्वांनाच शक्‍य नाही. त्यामुळे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणे आवश्‍यक आहे.'' चर्चेत शेतकरी सत्यवान सावंत, राजेंद्र राणे, गुलजान काझी, भालचंद्र ताम्हाणकर, महेंद्र संसारे, विनोद तांबे, महेश पाटील यांनी सहभाग घेतला. 

कोकणातील शेतकरी म्हणजे विद्यापीठच 
चिंचवलीतील शेतकरी अनिल पेडणेकर यांनी आपल्या प्रक्षेत्रात तब्बल 17 पिकांची लागवड केली. या सर्व पिकांची पाहणी श्री. भुसे यांनी केली. असा प्रयोग आपण महाराष्ट्रात प्रथमच पाहतोय. इथले शेतकरी हे एक प्रकारचे विद्यापीठच आहेत. त्यांच्या ज्ञानाचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना व्हायला हवा, त्याअनुषंगाने कार्यवाही करू, अशी ग्वाहीही श्री. भुसे यांनी दिली. 

संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT