gowalkot mortar port to fort in chiplun ratnagiri 
कोकण

गोवळकोट बंदरातील तोफा किल्ल्यावर नेण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : गोवळकोट बंदरावरील चार ऐतिहासिक तोफा काढून गोवळकोटच्या किल्ल्यावर सुरक्षित ठेवल्या जाणार आहेत. राजे प्रतिष्ठानकडून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 

चिपळूण शहराची शान म्हणून गोवळकोटच्या ऐतिहासिक किल्ल्याकडे पाहिले जाते. या गोविंद गडावर आणि गोवळकोट बंदरावर ऐतिहासिक तोफा आहेत. शुक्रवारी (ता. 19) सकाळी 10 वा. शिवजयंतीच्या निमित्ताने चारही तोफा काढण्यात येणार आहेत. गोवळकोटमधील राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोट ग्रामस्थ यांच्यावतीने कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून या तोफा काढल्या जाणार आहेत. गडकिल्ले संवर्धन समिती सदस्य डॉ. सचिन जोशी, इतिहास अभ्यासक संदीप परांजपे, पुरातत्त्व विभाग रत्नागिरी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, कस्टम डिपार्टमेंट, तहसीलदार, पोलिस प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन राजे सामाजिक प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे. 

ठेवा नष्ट होऊ नये, यासाठी.. 

गोवळकोट बंदरावर गेली कित्येक वर्षे पुरलेल्या अवस्थेत असलेल्या तोफा आतल्या आत गंजून त्यांचा भुगा होण्याचा धोका होता. कोकणच्या लष्करी इतिहासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत मोलाचा हा ठेवा नष्ट होऊ नये, यासाठी बंदरावर पुरलेल्या 10 तोफांपैकी 6 तोफा काढून ऐतिहासिक किल्ले गोविंद गडावर सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या ऐतिहासिक तोफा पाहण्यासाठी अनेक गडप्रेमी, शिवप्रेमी गडावर येऊन तोफा पाहतात. उर्वरित चार तोफा गोवळकोट बंदरावर अजूनही पुरलेल्या आहेत.  

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT