gram panchayat election appoint of officers on election center in kankavli sindhudurg
gram panchayat election appoint of officers on election center in kankavli sindhudurg 
कोकण

ग्रामपंचायत केंद्रांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती ; तयारी पुर्ण

तुषार सावंत

कणकवली (सिंधुदुर्ग)  : तालुक्‍यातील तोंडवली-बापावशी आणि भिरवंडे ग्रामपंचायतीच्या दहा जागांसाठी 15 जानेवारीला मतदान होत आहे. यासाठी पाच केंद्रांवर 35 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. उद्या हे कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रमेश पवार यांनी दिली आहे.

तालुक्‍यातील तोंडवली - बावशी ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी एकूण पंधरा उमेदवार रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतीच्या तीन केंद्रावर मतदान होणार आहे. तर भिरवंडे ग्रामपंचायतीच्या सात पैकी चार जागा बिनविरोध झाल्या असून तीन जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी भिरवंडे येथे दोन केंद्रावर हे मतदान होणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सहाय्यक अधिकारी, शिपाई, अंगणवाडी सेविका असे आठ कर्मचारी असून सुरक्षितेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. 

मतदान केंद्रावर ईएमव्हीमशीन द्वारे मतदान होणार असून प्रभाग निहाय उमेदवार एका मशीनद्वारे मतदान होणार आहे. मतदान केंद्राच्या 200 मीटरवर कार्यकर्त्यांना पोलिंग बूथ लावता येणार आहे. मतदान केंद्रांसाठी दोन झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान 15 जानेवारीला सकाळी 7.30 ते सांयकाळी 5.30 यावेळेत होणार आहे. मतदान केंद्रावर आरोग्य पथक ही असेल. सर्वानी आचारसंहितेचे पालण करणे बंधनकारक आहे. उमदेवारांचा प्रचाराची सांगता झाली आहे. उद्या जाहीर प्रचार सभा घेता येणार नाही. केवळ मतदारांच्या भेटी घेता येणार आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT