gram panchayat election atmosphere pawas ratnagiri 
कोकण

 सेना व भाजप आमने-सामने: आता होणार सख्ख्या जावांमध्ये सामना!

सकाळ वृत्तसेवा

पावस (रत्नागिरी) :  पावस ग्रामपंचायत निवडणुकीची प्रचार यंत्रणा अंतिम टप्प्यात असताना एका प्रभागांमध्ये दोन माजी सरपंच रिंगणात उतरले आहेत. एका प्रभागामध्ये दोन सख्ख्या जावा एकमेकांसमोर उभ्या राहिल्या असून सेना-भाजप समोरासमोर लढत असताना सेनेच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत.

२०१५ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत सेना विरुद्ध गाव पॅनेल अशी लढत झाली होती. त्यावेळी शिवसेनेला जास्त जागा मिळूनही सरपंचपदाला मुकावे लागले होते. अखेर कमी जागा असलेल्या गाव पॅनेलचा सरपंच, उपसरपंच बसला होता. अखेर आमदारांच्या शिष्टाई झाल्यानंतर दोघांनीही व इतर सदस्यांनी सेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे सध्या सेनेचे वर्चस्व आहे. १३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत सेना व भाजप प्रथमच आमने-सामने आले आहेत. त्यातील दोन जागावर उमेदवार न मिळाल्याने सेनेच्या दोन जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे ११ जागांसाठी निवडणूक होणार असून त्यातील प्रभाग एकमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी सरपंच सुभाष पावसकर पुन्हा सरपंचपद मिळेल, या आशेने पुन्हा रिंगणात उतरले आहेत. परंतु शिवसेनेकडून नवीन चेहऱ्याला संधी न दिल्यामुळे युवा नेता रिंगणात उतरला आहे.

 युवासेनेचा कार्यकर्ता भाजपच्या मदतीने रिंगणात उतरल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. या प्रभागामध्ये नव्याने तेलीवाडी जोडल्यामुळे भाजपाच्या माजी सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य स्नेहगंधा साळुंखे पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर सेनेच्या सौ. गुरव रिंगणात उतरले आहेत. हा प्रभाग पारंपरिक सेनेचा बालेकिल्ला होता. मात्र, मागील निवडणुकीत गाव पॅनेलच्या सदस्यांनी दणका दिल्याने सेनेचे अस्तित्व धोक्‍यात आले होते. परंतु येथील सदस्यांनी सेनेत प्रवेश केल्यामुळे पुन्हा एकदा सेनेचे पारडे जड दिसून येत आहे. 

 प्रभाग चारमध्ये सेनेच्या विरोधात तीन उमेदवार 
मागील निवडणुकीत गाव पॅनेलचे वर्चस्व असलेल्या प्रभाग चारमध्ये सेनेच्या विरोधात तीन उमेदवार उभे केले असून त्यात सेना व भाजप यांनी दोन सख्ख्या जावांना एकमेकांसमोर उतरवले असून दोन सख्ख्या भावांना वेगवेगळ्या पक्षांचा प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT