on gram panchayat election BJP face political problems in related tehsil in ratnagiri 
कोकण

भाजपपुढे आता गटतट मिटवण्याचे आव्हान ; निष्ठावंत, जुनेजाणते अजूनही बाहेरच

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : भाजपमधील अंतर्गत कलह अजून सुरूच आहे. ग्रामपंचायत निवडणुका लागल्या तरी जुनाजाणता आणि ग्रामीण भागातील राजकीय बारकावे माहिती असलेला भाजपचा एक गट प्रवाहाच्या बाहेर आहे. निवडणुकांपूर्वी वज्रमूठ होत नाही, तोवर भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळविणे कठीण आहे. माजी मंत्री रवींद्र चव्हाण गटाचे दुर्लक्ष झाल्याने निष्ठावंतांनी आपल्या भागातील ग्रामपंचायती आपल्या हिमतीवर निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. 

भाजपला तालुक्‍यातील गटातटाची आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी देखील माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या गटातटाबाबत जाहीर वक्तव्य केले होते. गटतट असूदेत पण पक्षबांधणी आणि वाढीवर त्याचा परिणाम होता कामा नये, असे बजावूनही अंतर्गत कलह सुरूच आहे. तालुक्‍यात भाजपला मानणारा एक वर्ग आहे. विधानसभा निवडणुकीत सुमारे ४० हजारपर्यंत भाजपची मते त्यांच्या पारड्यात पडतातच; मात्र ग्रामपंचायत निवडणुका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना मार खावा लागतो. मात्र, आता केंद्रातील सत्ता आणि जिल्ह्यातील बदलत्या राजकारणामुळे भाजपने उचल खाल्ली आहे. दोन्ही गटांनी एकोप्याने काम केल्यास शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्याची ताकद आहे. 

तालुक्‍यात ५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या आहेत. त्यापैकी ६ भाजपच्या ग्रामपंचायती आहेत. यामध्ये प्रवाहातून बाजूला असलेल्या जुन्याजाणत्यांच्या भागातील या ग्रामपंचायती आहेत. त्यांना आता प्रवाहात सामावून घेण्याबाबत अजूनही स्थानिक पातळीवर हालचाली दिसत नाहीत.

निष्ठावंतांना पूर्ण खात्री

रवींद्र चव्हाण रत्नागिरी दौऱ्यावर गटबाजीचा हा गुंता सोडवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निष्ठावंतांना पूर्ण खात्री आहे की त्यांना बाजूलाच ठेवले जाणार. म्हणून त्यांनी आपल्या भागातील ग्रामपंचायती निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. उमेदवार निश्‍चित केले असून प्रतिष्ठा जपण्यासाठी त्या ग्रामपंचायती ते निवडून आणण्यात व्यस्त आहेत. 

भाजपचे निष्ठावंत, जुनेजाणते अजून बाहेरच

प्रदेश चिटणीस रवींद्र चव्हाण यांनी देखील गटातटातील मतभेद लवकरच मिटवू, असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांचे अनेक दौरे झाले. मात्र, भाजपचे निष्ठावंत, जुनेजाणते माजी आमदार, माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सतीश शेवडे, नाना शिंदे, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, दादा दळी हा गट अजून बाहेरच आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'यार हे कोणाला बाहेर ठेवणार?', भारताचा संघ पाहून शोएब अख्तर चक्रावला; पाहा काय म्हणाला

Banjara community Reservation : बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटियरनुसार आरक्षण द्या; आ. संजना जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Maharashtra Rain Update: मुंबई पुणेकरांनो सावधान! हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

Pune Police : घराचा धागा पुन्हा जुळला; पोलिसांनी तरुणीला दिला मायेचा आधार

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

SCROLL FOR NEXT