gram panchayat election mandangad ratnagiri Former MLA Sanjay Kadam shiv sena criticise 
कोकण

शिवसेनेला नाराजी भोवणार: कार्यकर्ते राष्ट्रवादीत आले, तर त्यांचे स्वागतच

सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : दापोली मतदारसंघात मिळणाऱ्या वागणुकीवर नाराज असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. नाराजांच्या अन्य पक्षांच्या श्रेष्ठींसमवेत गुप्त बैठका होत आहेत. त्या नेत्यांसमोर मागण्या ठेवल्या आहेत, त्या तडीस गेल्यास दापोली विधानसभा मतदारसंघात राजकीय भूकंप होण्याची शक्‍यता राजकीय जाणकारांकडून वर्तवण्यात येत आहे. या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू दापोली, मंडणगड, खेड या तीनही तालुक्‍यांत राहण्याची दाट शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.


२०१९ विधानसभा निवडणुकीनंतर दापोली मतदारसंघातील राजकीय वातावरण वेगळ्या वाटेवर जात असल्याचे वेळोवेळी दिसून आले. राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि सरकार स्थापन करण्यात आले. मात्र, स्थानिक पातळींवर याचा फारसा प्रभाव अद्याप जाणवलेला नाही. २०१९ च्या निवडणुकीनंतर दापोली मतदारसंघात प्रत्येक पक्षात राजकीय बदल झाले. पक्षांचे पदाधिकारी, राजकीय निकटवर्ती व्यक्ती बदलण्यात आले. त्यामुळे पक्ष संघटनेसह सामाजिक क्षेत्रात अस्वस्थता होती. निर्माण केलेले राजकीय अस्तित्व आणि पक्षातील आपले महत्त्व टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने नेत्यांकडून सावध पवित्रा घेण्यात येत आहे.

पक्षालाही तोटा होऊ नये, म्हणून वरिष्ठ अशा नाराजांची मने कुरवळण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या अधिकार व हक्कासाठी राजकीय विविध पातळींवर नेतृत्वाची मागणी करताना अग्रेसर भूमिका घेतल्याची अंतर्गत परिस्थिती आहे. स्व: पक्षातील वरिष्ठांना चाचपून पाहिल्यानंतर अन्य पक्षांतील प्रमुख नेतृत्वाच्या गाठीभेटी घेताना सावधपणे अत्यंत गुप्तता पाळण्यात आली. मात्र, माहिती बाहेर पडलीच.

मागण्यांची पूर्तता झाल्यास.. 
नाराजांनी ठेवलेल्या मागण्यांची पूर्तता झाल्यास आगामी काळात तीन तालुक्‍यांत ही राजकीय उलथापालथ होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. दापोली मतदारसंघातील ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीतील मतांची गणिते बदलणार असून त्याचा फायदा कोणाला होतो, हे कळण्यास मात्र काही काळ जावा लागणार आहे.

निवडणुकांपर्यंत कार्यकर्त्यांना गोंजारायचे. निवडणुका झाल्या की त्यांना दूर लोटायचे, यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी वाढली आहे. परिणामी हे कार्यकर्ते इतर पक्षांकडे जाऊ इच्छित आहेत. असे नाराज कार्यकर्ते राष्ट्रवादीत आले, तर त्यांचे स्वागतच करू.
- माजी आमदार संजय कदम

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Name Change Demand : आता थेट दिल्लीच्याही नावात बदल होणार? ; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना 'या' व्यक्तीने पाठवलंय पत्र!

Balapur News : भिंत कोसळून आठ वर्षीय चिमुकला ठार; गावावर शोककळा

Women's World Cup 2025: भारताचा बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे रद्द! साखळी फेरी संपली पाँइट्सटेबलमध्ये कोण कोणत्या स्थानी?

Tejashwi Yadav on Waqf Act : ‘’…तर आम्ही ‘वक्फ कायदा’ कचऱ्याच्या डब्यात टाकू’’ ; तेजस्वी यादव यांचं मोठं विधान!

Mohol Politics : अखेर ठरलं! सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांचा बुधवारी हजारो कार्यकर्त्यासह भाजपात होणार प्रवेश

SCROLL FOR NEXT