grampanchayat election rashtrawadi and shivsena party opposition party run the election in ratnagiri 
कोकण

शिवसेना-राष्ट्रवादीत रंगणार आता सामना ; भाजपही उतरणार ताकदीने

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या आणि लॉकडाउनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या जिल्ह्यातील ४७९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. आचारसंहिता जाहीर झाली असून, ऐन थंडीत गावोगावी निवडणूक रणधुमाळी सुरू होणार आहे. 

राज्यात तीन पक्षांची महाविकास आघाडी असली तरीही ग्रामपंचायत स्तरावर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने लढण्याची शक्‍यता आहे. भाजपही ताकदीने रणांगणात उतरणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.

राजकीय आघाडीवर

रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने दापोली, खेड, मंडणगड, गुहागर, चिपळुणात चांगले हातपाय पसरले आहेत. राज्यात सत्तेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडी कार्यरत आहेत. 

गावपातळीवरील राजकारण वेगळेच असल्याने ही आघाडी राहणे शक्‍य नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेना, ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांची कसोटी आहे. निवडणुकीची शक्‍यता असल्याने गेल्या काही दिवसांत गावागावांत बैठका झडू लागल्या आहेत. वातावरण तयार झाले असून, उमेदवार निवडणे यासह मेळाव्यांचे नियोजन पक्षाच्या नेत्यांवर अवलंबून आहे. रत्नागिरी तालुका वगळता अन्य सगळीकडे गावागावांत आघाडीत बिघाडी दिसेल. याच संधीचा फायदा भाजप उठवण्याची शक्‍यता व्यक्‍त आहे. त्यादृष्टीने भाजप नेते तयारीला लागले आहेत. रत्नागिरीत शिवसेनेकडून जिल्हा परिषद गटनिहाय मेळाव्याचे आयोजन काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते.


तालुका       ग्रामपंचायती

मंडणगड          १५
दापोली            ५७
खेड               ८७
चिपळूण          ८३
गुहागर           २९
संगमेश्‍वर        ८१
रत्नागिरी         ५३
लांजा            २३
राजापूर          ५१

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Abu Salem : सुप्रीम कोर्टाने अबू सालेमला फटकारले, याचिक रद्द करत म्हटले- " टाडा अंतर्गत सजा मिळालीय, समाजाचं भल केलं म्हणून नाही"

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

Latest Marathi News Update : पुण्यातील भाजपा आणि काँग्रेस राडा प्रकरण; धीरज घाटे रवींद्र चव्हाणांना भेटणार

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

SCROLL FOR NEXT