grampanyat election results in ratnagiri most of the and shiv sena win most of seats in ratnagiri 
कोकण

Gram Panchayat Results : पंधरा वर्षे भाजपच्या ताब्यात असलेल्या चांदेराई ग्रामपंचायतीत शिवसेनेची एन्ट्री

राजेश शेळके

रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला रत्नागिरी जिल्ह्यात शांततेत सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व दिसुन येत आहे. तालुक्यातील पहिल्या लॉटमध्ये जाहीर झालेल्या ११ ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. तर दोन ग्रामपंचायतीवर गावकऱ्यांचे वर्चस्व आहे. एक जागा त्रिशंकू असून दोन ठिकाणी निकाल टाय झाला आहे. 

  • कर्ला ग्रामपंचायत - १३ पैकी ११ शिवसेनेचे उमेदवार विजयी 
  • कोतवडे - ५ भाजप, ५ सेना व अपक्ष १ 
  • खेडशी - १३ पैकी १३ शिवसेना
  • दांडेआडम - ९ पैकी ९ जागा शिवसेना 
  • चांदेराई - ७ पैकी ५ जागांवर शिवसेना २ भाजप
  • ओरी गाव पॅनेल - ७ शिवसेना - २ 

रत्नागिरी  ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट - 

कळझोनदी - प्रभाग १ : ६ पैकी ३ शिवसेना, प्रभाग २ : भाजप २, शिवसेना २, प्रभाग ३ : ३ शिवसेना

तसेच रामपूर माजी सभापती पप्या चव्हाण ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झाले आहेत. सावर्डे माजी सभापती समीक्षा बागवे सदस्य म्हणून विजयी झाल्या आहेत. सावर्डेत पुन्हा एकदा आमदार निकम यांची सत्ता आली असुन सर्व ९ जागा आमदार निकम गटाने जिंकल्या आहेत. त्याचप्रमाणे सती चिंचघरी येथे सत्तांतर झाले असुन राजाभाऊ चाळके या गटाने एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. इकडे अडरेत मात्र सत्ताधाऱ्यांचा सुफडा साफ झाला आहे. ९ विरुद्ध ० असा निकाल लागला असुन माजी सरपंच विजय सुर्वे यांचे पॅनल पराभूत झाले आहेत. 

संपादन - स्नेहल कदम 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

‘दुःखी असलात तरी फॅशनेबल दिसावं लागतं...’; प्रीती झिंटा कलाकारांबद्दल स्पष्टच बोलली, म्हणाली...

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT