Great loss of nuts cause due to wind kokan arathi news 
कोकण

सह्याद्रीच्या 'या' पट्ट्यातील मोहोराला निर्माण झालाय धोका.....

सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगांमध्ये गेले दोन दिवस सुरू असलेल्या जोरदार वाऱ्यामुळे काजू बागांचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे कच्चे काजू आणि मोहोर गळून पडला आहे. दुसरीकडे तापमानात वाढ झाल्यामुळे मोहोर करपत चालला आहे.
सिंधुदुर्गात दोन दिवस वाऱ्याचा वेग वाढला आहे. सकाळच्या सत्रात वाऱ्यांचा वेग प्रचंड होता. याचा मोठा फटका काजू पिकाला बसला आहे. काजूच्या झाडावरील कच्चे काजू आणि मोहोरदेखील वाऱ्याने गळून पडला आहे. पानेदेखील गळून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या गावात काजु बागांचे नुकसान
सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या कणकवली तालुक्‍यातील फोंडाघाट, 
हरकुळ, नरडवे, कनेडी तर वैभववाडी तालुक्‍यातील लोरे, आर्चिणे, कुर्ली, खांबाळे, नावळे, शिराळे, करूळ, जांभवडे, कुंभवडे, अरूळे, निमअरूळे, सांगुळवाडी या गावातील काजु बागांचे नुकसान अधिक प्रमाणात झाले आहे. त्यातच जिल्हयात उष्मा वाढला आहे. त्याचाही परिणाम काजू पिकावर होत आहे. काजूचा मोहोर अधिक तापमानामुळे करपला जात आहे.

दरवर्षीपेक्षा दोन महिने उशिरा काजू हंगाम
यावर्षी काजू हंगाम दरवर्षीपेक्षा दोन महिने उशिराने सुरू झाला. मोहोर येण्याची प्रकिया सुरू झाल्यापासून सातत्याने जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिले. या संकटाचा यशस्वी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा काजू बागांमधील पीक हातातोंडाशी आले होते; परंतु दोन दिवसांतील वाऱ्याने मोठे नुकसान केले आहे. आज सकाळपासून वाऱ्याचा वेग मंदावला असला तरी उष्णता वाढली आहे.त्यातच ढगाळ वातावरणामुळे मोहोर करपण्याची भीती आणखी गडद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Wedding Destination: शोधताय? हिमालयाच्या कुशीतलं हे मंदिर बनतंय नवविवाहितांचं आवडतं ठिकाण, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

SCROLL FOR NEXT