मूळगावी आंबडवेत महामानवाला अभिवादन sakal
कोकण

मूळगावी आंबडवेत महामानवाला अभिवादन

अस्तिकळशापुढे नतमस्तक; दिवसभर अनुयायांची स्मारक भेट

सचिन माळी -सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : ६ डिसेंबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या संख्येने अनुयायांनी त्यांच्या मुळगावी आंबडवेला भेट दिली. स्मारकात स्थानापन्न बाबासाहेबांच्या पुतळा व ठेवण्यात आलेल्या अस्तिकळशापुढे नतमस्तक होत अभिवादन केले. अभिवादन करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व तालुक्यातील आंबेडकरी अनुयायांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी सामाजिक, राजकीय, शासकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

डॉ.बाबासाहेबांच्या जीवनातील संस्मरणीय स्थळ म्हणजे तालुक्यातील आंबडवे हे गाव होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त महामानवास तालुक्यात ठिकठीकाणी अभिवादन करण्यात आले. कोरोना विषाणु संसर्गाचे पार्श्वभुमीवर महापरिनिर्वाण दिन साजरा करताना आंबडवे येेथे विशेष काळजी घेण्यात आली होती. त्यामध्ये आरोग्य विभागाचेवतीने स्मारक परिसरात प्रवेश करण्यापुर्वी सगळ्या नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येत होती. थर्मल स्कँनींग तपामान तपासणी करुन सँनिटायझरचा वापर अनिवार्य करण्यात आला होता. प्रतिवर्षाप्रमाणे स्मारकात अस्थीकलश व बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून पूजन करून अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास रत्नागिरी समाज कल्याण विभागाचे आयुक्त संतोष चिकणे, तहसिलदार दत्तात्रय बेर्डे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, सरपंच किरण धामणे, सर्कल श्री. साळवी, महसुलचे कार्यातील अनिल जाधव, सुरज गायकवाड, तलाठी मनोहर पवार, ग्रामस्थ सुदाम सुकपाळ, नरेंद्र सकपाळ, सुदर्शन सकपाळ, रंजन धोत्रे व आंबडवे पंचक्रोशीतील नागरीक उपस्थित होते. दिवसभर तालुका व तालुक्या बाहेरील अनुयायांनी स्मारकास भेट देत महामानवास अभिवादन केले. यावेळी ग्रामस्थ मंडळाचेवतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान तालुक्यातही ठिकठीकाणी महामानवास कोव्हीड नियमावलीचे पालन करीत अभिवादन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 65 व्या महापरिनिर्वाण दिनी आंबडवे या मुळगावी राष्ट्रपती रामनाथ कोविंद भेट देणार होते. याचबरोबर पंतप्रधान लाईव्ह प्रेक्षपणाचे माध्यमातून थेट संवाद साधणार होते. हे दोन्ही कार्यक्रम रद्द झाल्याने तालुक्यातील नागरीकांमध्ये नाराजी दिसून आली. दौऱ्याचे पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काही दिवसापुर्वी तयारी सुरु करण्यात आली होती. स्मारकास नव्याने रंगरंगोटी करण्यात आली होती. याचबरोबर आंबडवे गाव परिसरात स्वच्छता करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT