gruhagar police action wedding landed trouble lock down  
कोकण

वधू-वर लग्न बेडीत अन् भटजीसह नातेवाईक पोलिस बेडीत 

सकाळ वृत्तसेवा

गुहागर - सध्या जगभरासह देशातही कोरोनाणे थैयामान घातले आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून देशभरात लाॅकडाऊन जाहीर केला आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या राजकीय, सांस्कृतीक, क्रीडा, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, असे असतानाही काही ठीकाणी नियम डावलून असे कार्यक्रम घेतले जात आहेत. गुहागरमध्येही असाच एक लग्नसमारंभ पार पडला. या समारंभात वधू आणि वर लग्न बेडीत आडकले, मात्र गावच्या पोलिस पाटलासह समारंभाला उपस्थित सर्व नातेवाईक आणि लग्न लावणारा भटजीही पोलिसांच्या बेडीत अडकले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी,  लाॅकडाऊन असतानाही गुहागर तालुक्यातील कोसबीवाडीत शंभर सव्वाशे नातेवाईकांच्या उपस्थितील एक लग्न समारंभ पार पडला. या समारंभाची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी गटनास्थळी धाव घेत उपस्थितांवर कारवाई केली. विशेष म्हणजे पोलिसांनी यावेळी सरकारचा आदेश डावलून लग्न समारंभास उपस्थित असलेला गावचा पोलिस पाटील आणि भटजीवरही गुन्हा दाखल केला आहे.  पोलिस काॅन्स्टेबल संतोष साळसकर, पोलिस उपनिरीक्षक किरणकुमार कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

यात वराचे वडील अनंत वेले, वधूचे वडील प्रकाश हारेकर, पोलिसपाटील सिध्दोधन मोहिते, भटजी संजय जोशी यांच्यावर गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता प्रादेशिक सैन्यातही महिलांना संधी मिळणार, भारतीय लष्कराचा प्रायोगिक तत्वावर विचार

Dombivli Politics: टिळकनगरमध्ये मतदारांचा वेगळा कौल; 'स्थानिकच नगरसेवक हवा, उपरा नकोच'!

Latest Marathi Breaking News : अहिल्यानगर मधील खारेकर्जुन येथे बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला

Stock Market Today : शेअर बाजाची हिरव्या रंगात सुरुवात; सेन्सेक्स 240 अंकांनी वाढला; तर निफ्टी बँकने उच्चांक गाठला!

Truck Catches Fire: 'ट्रकला आग लागून २९ गायी भस्मसात'; नागपुरातील कत्तलखान्यासाठी गायींची बेकायदा वाहतूक, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT