uday samant
uday samant esakal
कोकण

'मुख्यमंत्री पिंजऱ्यात तर पंतप्रधान कुठे'' ?

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) : कोरोना प्रादुर्भावाचे राजकारण करत खासदार नारायण राणेंसह काही विरोधक मुख्यमंत्र्यांवर पिंजऱ्यात बसल्याची टीका करत आहेत. जर मुख्यमंत्री पिंजऱ्यात असतील तर पंतप्रधान मोदी कुठे बसलेत याचाही शोध विरोधकांनी घ्यायला हवा. जे आरोप तुम्ही मुख्यमंत्र्यांवर करताय तेच पंतप्रधानांनाही लागू पडतात, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

येथील तहसील कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्‍यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, पोलिस निरीक्षक मुल्ला, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय पोळ, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

सामंत म्हणाले, "कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्य संपूर्ण जनतेने पाहिलंय. तसंच कोरोना साथरोग काळातही विरोधक कसं राजकारण करतांत हे देखील इथली जनता पाहतेय. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याची मूळीच गरज नाही. विरोधकांच्या आरोपांनाही आम्ही फारसे महत्व देत नाही. या उलट कोरोना रोखण्यासाठी जास्तीत जास्त काम उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत."

पुढे ते म्हणाले, "कोरोनाच्या मुद्दयावर मुख्यमंत्र्यांना दूषणं देणाऱ्या विरोधकांनी आधी उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशची स्थिती पहायला हवी. त्या भागातील कोरोनाग्रस्तांची खरी आकडेवारी कधीच बाहेर येत नाही; पण या दोन्ही राज्यातील अनेक स्मशाभूमींमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी जागा नसणे. एकाचवेळी अनेक चिता पेटलेल्या स्थितीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री काय करतात यापेक्षा पंतप्रधान काय करतात हे देखील विरोधकांनी पहायला हवं.''

... तर डॉ. चव्हाणांवरकारवाई होणार

पाच दिवस पोलिस कोठडीत राहिल्याने तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण आपोआप सेवेतून निलंबित झालेले आहेत. त्यांच्याकडे सध्या कोणताही चार्ज नाही. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक पदावर बसून कारभार चालविण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. तरीही ते जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात येत असतील, तेथील अधिकाऱ्यांना त्रास देत असतील तर त्यांच्यावर रीतसर कारवाई करा असे निर्देश आजच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांना दिले असल्याची माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली.

Edited By- Archana Banage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT