guhagar sakal
कोकण

गुहागर सीआरझेड वर्ग २ मध्ये येणार

तटकरे; हिवाळी अधिवेशनापर्यंत निर्णय, महामार्ग कामाबाबत बैठक घेणार

सकाळ वृत्तसेवा

गुहागर : चेन्नईमधील संस्थेकडून सीआरझेड २ मध्ये वर्ग होण्याबाबतचा आराखडा आल्यावर गुहागर नगरपंचायतीचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत गुहागर सीआरझेड वर्ग २ मध्ये येईल, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी गुहागरमध्ये व्यक्त केला. तसेच महामार्गाच्या कामासंदर्भातील अडचणी, तक्रारी सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसाबेत गुहागरमध्ये बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी खासदार सुनील तटकरे शुक्रवारी (ता. २४) गुहागरला आले होते. त्या वेळी पत्रकारांशी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सीआरझेड वर्ग २ ची प्रत्यक्ष रेषा निश्चित करण्याचे काम चेन्नईमधील संस्थेकडे आहे. हे काम पूर्ण झाल्यावर गुहागर नगरपंचायत क्षेत्र सीआरझेड वर्ग २ मध्ये येण्याची प्रक्रिया शासनाकडून होईल. येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय पूर्णपणे मार्गी लागण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. नगरपंचायतीला विकास आराखडा हा लवकर मंजूर करून घ्यावा लागेल. परंतु सीआरझेड वर्ग २ मध्ये येण्यासाठी विकास आराखडा नसल्याने अडचण निर्माण होणार नाही.

गुहागर-विजापूर महामार्गाच्या कामासंदर्भात बोलताना खासदार तटकरे म्हणाले, पुढच्या गुहागरच्या दौऱ्यात गुहागर-विजापूर महामार्गाचा ठेकेदार, येथील अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत एका बैठकीचे आयोजन करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Salian Case: आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ! दिशा सालियन प्रकरणात ५०० कोटींची भरपाई अन् बिनशर्त माफीची मागणी

Chiplun Flyover Work : चिपळूणकरांसाठी महत्त्वाची बातमी! उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात, पण 'या' कारणामुळे गणेशोत्सवात काम थांबले!

Arnala Fort History: २२९ वर्षांपूर्वी अर्नाळा किल्ल्यावर कसा साजरा व्हायचा गणेशोत्सव? मोडी कागदपत्रांतून ऐतिहासिक रहस्य उलगडलं

Latest Marathi News Update : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सरकार पाठीशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Ujani Water Crisis : उजनी परिसरातील वीज दोन तासांवर आणण्याच्या हालचाली ; सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तीव्र

SCROLL FOR NEXT