Gujarati Family stuck In Sindhudurg Due To Ban In Goa 
कोकण

गोव्यात बंदीमुळे गुजराती कुटुंब अडकले सिंधुदुर्गात

सकाळवृत्तसेवा

बांदा ( सिंधुदुर्ग ) - गुजरातहुन गोव्यात जाणाऱ्या पाच जणांच्या गुजराती कुटुंबाला पत्रादेवी सीमेवर गोव्यात प्रवेश नाकारण्यात आल्याने हे कुटुंब गेली दोन दिवस बांदा व परिसरात मदतीच्या प्रतिक्षेत फिरत आहे. थेट गुजरात येथून हे कुटुंब बांद्यात आलेच कसे याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लॉकडाऊन असल्याने सिंधुदुर्ग-गोवा सीमा बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या वाहनांना पूर्ण तपासणी करूनच प्रवेश देण्यात येत आहे. काल मंगळवारी सकाळी गुजरातहुन गोव्यात गुजराती कुटुंब जात होते. 

हे कुटुंब गुजरात मध्ये लग्न असल्याने त्याठिकाणी अडकले होते. कळंगुट-गोवा येथे या कुटुंबाचे स्वतःचे घर व दुकान आहे. त्यांची मुले गोव्यात आहेत. गोव्यात जाण्यासाठी त्यांनी गुजरात प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेतली आहे. मात्र बिगर गोमंतकीयांना गोव्यात प्रवेश करण्यासाठी गोवा शासनाची ऑनलाईन परवानगी आवश्‍यक असल्याचे कारण त्यांना पत्रादेवी सीमेवर देण्यात आले. तसेच त्यांना गोव्यात प्रवेश नाकारण्यात आला. या कुटुंबाने गुजरात येथून बांद्यापर्यंत प्रवास केला आहे. त्यांना ठिकठिकाणी विशेषतः रेड झोन असलेल्या मुंबईतही अडविण्यात आले होते; मात्र परवानगी असल्याने त्यांना सोडण्यात आले. 

गुजराती कुटुंबाने येथपर्यंतचा प्रवास हा भाड्याच्या गाडीने केला आहे. कुटुंब याठिकाणी अडकल्याने मोटार चालक देखील या कुटुंबासोबत अडकला आहे. बांदा बसस्थानकात या कुटुंबाने आसरा घेतला आहे. गोव्यात प्रवेश करण्यासाठी कालच त्यांनी ऑनलाईन परवानगीसाठी अर्ज केला आहे; मात्र अद्यापपर्यंत त्यांना गोवा शासनाकडून कोणतेही उत्तर मिळालेली नाही. बांदा बसस्थानकात या कुटुंबाला स्थानिकांनी विचारणा केल्याने या कुटुंबाने आपला मुक्काम बांदा-डेगवे सीमेवर हलविला आहे. हे कुटुंब गोवा शासनाकडून कधी प्रतिसाद मिळतो याकडे डोळे लावून बसले आहेत. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Maharashtra SET Exam 2026 : सेट परीक्षेच्या तारख्येत पुन्हा बदल! आता 27 ऐवजी 'या' दिवशी होणार परीक्षा, विद्यापीठाची नवीन घोषणा

SCROLL FOR NEXT