harassment for girl ratnagiri 
कोकण

 नोकरीच्या आमिषाने अल्पवयीन तरुणीला वेश्‍या व्यवसायास भाग पाडून लैंगिक अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - नोकरीच्या आमिषाने अल्पवयीन तरुणीला वेश्‍या व्यवसायास भाग पाडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी शुक्रवारी दोन महिलांसह तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी दलालासह ग्राहकही आता चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. 

याप्रकरणी ताराचंद तिठे (३२, खेड-सुकीवली) यांच्यासह दोन महिलांना अटक केली आहे. आतापर्यंत याप्रकरणी सात जणांना अटक झाली आहे. यापूर्वी मोहम्मद शेख, रिक्षाचालक आश्रफ चौघुले, हॉटेल व्यवस्थापक विजय काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद याची पीडित तरुणाच्या बहिणीशी ओळख होती. 

याचा गैरफायदा घेत त्याने तिच्या लहान बहिणीला नोकरीस लावतो असे सांगून त्याने आणि त्याच्या ओळखीच्या इतर लोकांनी त्या अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी दलालांची कसून चौकशी सुरू केली असून त्यामध्ये आता काही ग्राहकांची नावे पुढे येत आहेत. यातूनच या वेश्‍या व्यवसायात मोठी साखळी असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

शेख, चौघुले व काकडेच्या चौकशीतून याप्रकरणी पवार याचे नाव पुढे येताच त्याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. यापूर्वी अटक केलेल्या तिघांची पोलिस कोठडी संपताच त्यांना बुधवारी न्यायालयात पुन्हा हजर केले. त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी केली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात प्रथमच दोन महिलांना अटक केली आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT