Harnai Port Educational Trips  esakal
कोकण

दापोली समुद्रकिनारी शैक्षणिक सहलींची संख्या वाढली; 'या' ऐतिहासिक गड-किल्ल्यांना विद्यार्थी देताहेत भेट

दापोली किनारी (Dapoli) पर्यटनासाठी येणाऱ्या शैक्षणिक सहलींची (Educational Trip) संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

राधेश लिंगायत

हर्णै (Harnai Port) हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध ठिकाण आहे. तेथे सुवर्णदुर्ग, फत्तेगड, गोवा किल्ला, कनकदुर्ग असे चार किल्ले आहेत.

हर्णै : दापोली किनारी (Dapoli) पर्यटनासाठी येणाऱ्या शैक्षणिक सहलींची (Educational Trip) संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भामधूनही या सहली समुद्रकिनारा पाहण्यासाठी येत आहेत. नववर्ष स्वागतासाठी ३१ डिसेंबरला कसबा डिग्रज (ता. मिरज, सांगली) येथील न्यू इंग्लिश स्कूलची १६६ विद्यार्थ्यांची (Students) सहल हर्णैत आली होती. किल्ला पाहण्यासह त्यांनी किनाऱ्यावर फिरण्याचा आनंद घेतला.

निव्वळ समुद्र किंवा समुद्रात चालणारी मासेमारी हे पुस्तकातूनच शिकायला मिळते. परंतु प्रत्यक्षात भौगोलिकदृष्ट्या मुलांना त्याची माहिती देणे गरजेचेच असते. म्हणूनच सहलीसाठी समुद्रकिनारे निवडले जातात असे सहल घेऊन येणारे शिक्षक आवर्जून सांगतात.

मासेमारी हा मोठा व्यवसाय असून तो कशाप्रकारे केला जातो, समुद्र कसा असतो, या ठिकाणी मासेमारी कशी होते, मासेमारी करणाऱ्या बोटी कशा असतात, कोणते कोणते मासे या ठिकाणी मिळतात, माशांचं पुढे काय होतं, ते कसे निर्यात केले जातात, याचे व्यवहार ज्ञान मुलांना मिळावे हा फिरण्याबरोबरचा हेतू आहे.

हर्णै (Harnai Port) हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध ठिकाण आहे. तेथे सुवर्णदुर्ग, फत्तेगड, गोवा किल्ला, कनकदुर्ग असे चार किल्ले आहेत. छत्रपती शिवरायांनी आरमार कशाप्रकारे उभे केले, सरखेल कान्होजी आंग्रे यांचा इतिहास याठिकाणी मुलांना पटवून सांगण्यात आला. या वेळी पापलेट, तोवर, हलवा, म्हाकुळ, सुरमई, कोळंबी, सुकी मासळी आदी माशांचे अनेक प्रकार आलेल्या विद्यार्थ्यांनी पाहिले. समुद्रात ढोपराएवढ्या पाण्यात उभं राहण्याचा आनंद मुलांनी लुटला. या वेळी बळीराम पेडेकर, रोहित रघुवीर या मच्छीमार बांधवांनी मासेमारी म्हणजे काय, ती कशी केली जाते याची माहिती दिली. वाळूत खेळण्याचा आनंदही विद्यार्थ्यांनी घेतला.

प्रत्यक्षात मिळते माहिती

आमच्या विद्यार्थ्यांना मासेमारी आणि व्यवसाय याचे पुस्तकी ज्ञान असत. प्रत्यक्षात मासेमारी उद्योग काय असतो तो व्यवसाय करणारा हा मच्छीमार समाज कसा व्यवसाय करतो कोणकोणत्या प्रकारची मासळी मिळते. एकंदर मासेमारी व्यवसायाचे संपूर्ण ज्ञान प्रत्यक्षात मिळवण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना हा परिसर दाखवण्यासाठी आणले आहे, असे न्यू इंग्लिश स्कूल शाळेचे शिक्षक विठ्ठल देवकाते यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT