Health check-up instructions in old age home in konkan sindhudurg 
कोकण

वृद्धाश्रमात आरोग्य तपासणीच्या सूचना

विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील सर्व वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांची कोरोना पार्श्‍वभूमीवर तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. आज आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी कोरोना संदर्भात घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी हे आदेश दिले. पणदूर येथील आश्रमात कोरोना रुग्ण आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, अतिरिस्क जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे आदी उपस्थित होते. तालुका स्तरावरील यंत्रणा राबवून कोरोनाच्या चाचण्या कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 

यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी जिल्ह्यातील डॉक्‍टर्स, आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची माहिती केंद्र सरकारला पाठविण्याविषयी करावयाच्या कार्यवाहीविषयीचे मार्गदर्शन केले. जिल्ह्यांना कोविड-19 संदर्भात असलेल्या अडीअडचणी व समस्या व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जाणून घेतल्या. या व्हीडिओ कॉन्फरन्सनंतर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील कोविड 19 च्या परिस्थितीबाबत सविस्तर आढावा घेतला. 

तत्काळ नियोजन करा 
जिल्हाधिकारी म्हणाल्या, ""चाचण्यांसाठी तसेच नमुने गोळा करण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर एका व्हॅन उपलब्ध करून द्यावी. मोबाईल स्वॅब कलेक्‍शनची सोय आरोग्य यंत्रणेने करावी. "माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील इतर आजार असणाऱ्या नागरिकांची माहिती संकलीत झाली आहे. त्या आधारे तपासणीसाठी आरोग्य यंत्रणेने व्यवस्था करावी. त्यासाठी मोबाईल टेस्टींगची सोय उपयुक्त ठरेल. जिल्ह्यातील कोविड - 19च्या चाचण्या वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेने नियोजन करावे.''  

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT