Sindhudurg Monsoon esakal
कोकण

Sindhudurg Monsoon : सिंधुदुर्गात मॉन्सूनची जोरदार सलामी; वैभववाडीत सर्वाधिक पावसाची नोंद, देवगडलाही झोडपलं

सकाळी काही भागात हलक्या तर काही भागात जोरदार सरी बरसल्या; परंतु, दुपारनंतर पावसाने उघडीप दिली.

सकाळ डिजिटल टीम

जिल्ह्यात आजपासून ११ जूनपर्यंत ३५ ते ४५ किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहणार असून त्याचा वेग ५५ किलोमीटरपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

वैभववाडी : जिल्ह्यात मॉन्सूनने (Sindhudurg Monsoon) जोरदार सलामी दिली असून विजांच्या लखलखाटांसह गुरुवारी (ता. ६) मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. वैभववाडी आणि देवगडला तर मुसळधार पावसाने रात्रभर झोडपले. सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी वैभववाडीसह जिल्ह्याच्या काही भागात पुन्हा मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद वैभववाडीत ६२ मिलिमीटर इतकी झाली आहे.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी मॉन्सून दाखल झाला. सकाळी काही भागात हलक्या तर काही भागात जोरदार सरी बरसल्या; परंतु, दुपारनंतर पावसाने उघडीप दिली. सायंकाळी सर्वत्र ढगाळ वातावरण होते. रात्री साडेदहापासून जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरूवात झाली. वैभववाडी (Vaibhavwadi) आणि देवगड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले.

या दोन्ही तालुक्यात पहाटेपर्यत जोरदार सरी कोसळत होत्या. याशिवाय कणकवली, सावंतवाडी तालुक्यात देखील मॉन्सूनच्या चांगल्या सरी बरसल्या. कुडाळ, सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले तालुक्यात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी सर्वत्र ढगाळ वातावरण होते. काही भागात पावसाचा छिडकावा सुरू होता. सायंकाळी वैभववाडीसह जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झाला.

खते, बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची धावपळ

जिल्ह्यात खरीप हंगामात भातपीक लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. दमदार पावसामुळे आज सकाळपासून भातबियाणे आणि खते खरेदीसाठी शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील विविध कृषी सेवा केंद्र, तालुका खरेदी विक्री संघाच्या केंद्रांवर गर्दी केली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. आजपासून पुढील चार दिवस विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ९, १० व ११ जूनला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे.

-मच्छिंद्र सुकटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

समुद्रात वाहणार वादळी वारे

जिल्ह्यात आजपासून ११ जूनपर्यंत ३५ ते ४५ किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहणार असून त्याचा वेग ५५ किलोमीटरपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. तरी यांत्रिक व यंत्रचलित नौकांनी पावसाळी मासेमारी बंदी कालावधीचे पालन करावे. बिगर यांत्रिकी नौकांनी देखील या कालावधीत खाडी क्षेत्रात किंवा समुद्रात मासेमारीस जाऊ नये. वादळीवारेसह पाऊसाचे हवामान योग्य होईपर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही नौका वादळी हवामानाच्या या कालावधीत समुद्रात जाणार नाहीत, याबाबत खबरदारी घेण्यात यावी. नौका, जाळी, इंजिन आदी मासेमारी साधने सुरक्षित ठिकाणी ठेवावी. योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी केले आहे.

खरीप हंगामाला आजपासून प्रारंभ

जिल्ह्यात मॉन्सूनने जोरदार सलामी दिल्यामुळे आजपासून (ता. ८) खरीप हंगामाला प्रारंभ होणार आहे. उद्यापासून भातरोपवाटिका तयार करण्याच्या कामांना शेतकरी सुरुवात करतील, अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT