Heavy rain is forecast for Thursday June 18 in kokan 
कोकण

अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण होऊन वार्‍याचा वेग वाढला : मुसळधार पावसाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी :अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण होऊन वार्‍याचा वेग वाढल्याने गुरुवार 18 जूनपर्यंत धो धो पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. 

हवामान खात्याचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली. पुढील 24 तास मुंबई सह ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जोरदार पाउस होईल असा अंदाज असल्याने रेड ते ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

 दरम्यान मंगळवार पासून जिल्ह्यात धो धो पाऊस सुरू झाला आहे. बुधवारी सकाळपासून पावसाच जोर अधिक वाढला आहे. बुधवारी सकाळी मुसळधार पावसाने रत्नागिरी शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पावसाचा जोर गुरुवार पर्यंत कायम राहणार आहे.
जिल्ह्यात बुधवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी 52.22 मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 9, दापोली 20, खेड 24, गुहागर 53, चिपळूण 62 , संगमेश्वर 147, रत्नागिरी 30, राजापूर 82, लांजा 34 मिमी पाऊस झाला. 

संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री आणि सोनवी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर बाजारपेठ आणि रामपेठ परिसरातील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. शास्त्री पूल पिकप शेडच्यामागील डोंगर खचला आणि दरड पिकअप शेडच्यामागे कोसळली. या दरडीला लागून असलेली तीन घरांना धोका निर्माण झाला.  तहसीलदारांच्या सूचनेनुसार दोन घर खाली करण्यास सांगण्यात आले, तर एका कुटूंबाला सकाळपर्यंत स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील दोन दिवस अधिक मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा ईशारा हवामान विभागाने दिला आहे. पावसामुळे जिल्ह्यात शेतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत.              

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT