heavy rain kudal taluka konkan sindhudurg 
कोकण

बापरे! अनेक घरे धोक्याच्या छायेत, कुठे अन् कशामुळे?

अजय सावंत

कुडाळ (सिंधुदुर्ग) - अतिवृष्टीमुळे सरंबळ येथील डोंगर खचला असून तेथील पाच घरे धोक्‍याच्या छायेत आहेत. मुसळधार पावसामुळे येथील भंगसाळ नदीचे जुने पूल पाण्याखालीच आहे तर आंबेडकर नगराला पाण्याने वेढले आहे. ग्रामीण भागातही ठिकठिकाणी पुलावर पाणी आले होते. 

गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने सुरुवात केल्यामुळे येथील शहरातील भंगसाळ नदीचे जुने पूल पाण्याखाली गेले. आंबेडकर नगरात दरवर्षीप्रमाणे यंदाही घरांना पाण्याने वेढले. पावशी बेलनदीला सुद्धा पाणी आले; मात्र वाहतुकीवर परिणाम झाला नाही. काल रात्रीपासून लागत असलेल्या संततधार पावसामुळे पणदूर गावात हातेरी नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या पुराच्या पाण्यामुळे नुकतेच लावणी केलेले क्षेत्र पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. 

सरंबळ डोंगराचा धोका 
येथील सरबळ डोगराच्या पायथ्याशी पाच घरे आहेत या ठिकाणी झरे असल्याने डोगर खचण्याची प्रक्रिया सुरु आहे गेल्यावर्षीपासून डोगर कोसळत असल्याने यावर्षी तेथिल घरांना धोक्‍याच्या छायेत वावरावे लागत आहे

संपादन ः राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: रेल्वे प्रवाशांसाठी बातमी! दिवाळीपूर्वी रेल्वेचा मोठा निर्णय; पुणे-हडपसरहून अमरावती, गाझीपूर, गोरखपूरसाठी विशेष गाड्या

अर्थबोध : प्राप्तिकर विभागाला तुमचे उत्पन्न कळू शकते का?

म्युच्युअल फंड : ‘कॉन्ट्रॅरियन इन्व्हेस्टिंग’मधील संधी

Maharashtra Weather : मॉन्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; पुणे-सातारा-कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

करकायदा : ‘एमडीआर’वरील जीएसटी

SCROLL FOR NEXT