heavy rain nandgaon area konkan sindhudurg 
कोकण

कासार्डे परिसरात रस्त्यांना ओहोळाचे स्वरूप 

नेत्रा पावसकर

तळेरे (सिंधुदुर्ग) - परतीच्या पावसामुळे आज पुन्हा शेतकरी व नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कासार्डे व नांदगाव परिसरात ठिकठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर सर्व्हीस रोडवर पाणी साचून सेवा रस्त्याला ओहोळाचे स्वरुप आले होते. कासार्डे पोलीस आऊट पोस्टच्या सभोवताली पाणी साचले. कापणी केलेल्या भाताचे मोठे नुकसान झाले. 

गेली काही दिवस पावसाचे सावट असल्याने नांदगाव व कासार्डे परिसरात नागरिकांची दमछाक होत होती; मात्र पावसाचे ढग दाटून यायचे मात्र पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस थांबेल, की नाही आशी स्थिती असताना रविवारी पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गासह नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.

काही ठिकाणी भातकापणी केली होती ते भात भिजून चिंब होतेय ते शेतकऱ्यांना उभ्या डोळयांनी पाहावे लागले; मात्र त्यातही धीर न सोडता कापलेले भात घरी आणण्यासाठी आटापिटा सुरू असतानाचे चित्र दिसत होते. नांदगाव, तळेरे, कासार्डे भागात सर्व्हीस रोडचे रूपांतर ओहोळात झाले होते. कासार्डे येथील तांबळवाडी व देऊलकरवाडी या दोन वाड्यांना जोडणाऱ्या ओहोळावरील पुलावरून पाणी गेल्याने संपर्क तुटला होता. महापुरूष देवस्थान येथही पाणी आले होते. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्याच्या मुलीला वसतीगृहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांकडे कूलरबाबत केलेल्या तक्रारीच्या रागातून कारवाई

Ebola Alert in India: इबोला फैलावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; विमानतळांवर आफ्रिकन प्रवाशांसाठी कडक आरोग्य तपासणी लागू

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील अभंग प्रभू अकॅडमीमधील शिक्षक तेजस शहा याला सीबीआयकडून अटक

Taj Mahal History: ताजमहाल फक्त मुघलांचा की इराणचाही? अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांच्या आग्रा दौऱ्याने उकरून काढला ५०० वर्षे जुना इतिहास

Gokul Election 2026 : महाडिक, मुश्रीफ, कोरे, आबिटकर विरूद्ध सतेज पाटील लढणार गोकुळ निवडणूक?; सात संचालकांचा पाठिंबा, नव्या आघाडीची घोषणा

SCROLL FOR NEXT