कोकण

कोकण - हातखंबा नागपूरपेठेत पुराचा कहर; घरांना पाण्याचा वेढा

राजेश कळंबटे

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील (ratngiri) हातखंबा नागपूरपेठेत मुसळधार पावसाने (heavy rain) कहर केला. नदीकिनारी वसलेल्या या पेठेत रात्रीच्या सुमारास अचानक पाणी घुसले. अचानक एक मोठा लोंढा आला आणि वाडीतील काही घरांना पाण्याने वेढा घातला. काळसेकर, नाचणकरांच्या घरातील भांडीकुंडी, कपडे-लत्ते, सोन्या-नाण्यासह रोख रुपये ठेवलेले कपाटही पाण्याबरोबर वाहून गेलं. एकाला दोरीच्या सहाय्याने वाचवण्यात आले. येथील दहा घरांचे सुमारे 17 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

रविवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरीतील अनेक नद्यांना पूर आला. (flood water) वेगवान वार्‍यासह कोसळणार्‍या पावसाने हातखंबा नागपूरपेठ परिसरातील ग्रामस्थांचे रात्रीचा गोंधळ उडवली. साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नदीचे पाणी वाढले आणि किनार्‍यावरील घराच्या अंगणापर्यंत पोचले. काहींच्या पायरीला पाणी लागले होते. तासाभरानंतर पाणी ओसरले. घरात पाणी शिरेल असा कुणालाही अंदाज नव्हता; मात्र कोणालाही समजण्याच्या आत अंधारात अचानक पाण्याचा एक लोंढा आला आणि पाण्याने घरांना वेढा घातला.

कडी लावलेले दरवाजे तोडून पाणी घरात शिरले. त्याचा वेग एवढा होता की क्षणात सर्वकाही झाले. कोळसेकर यांच्या घरात आई आणि मुलगा दोघेच होते. ग्रामस्थांनी आईला सुरक्षित ठिकाणी नेले. मुलगा सन्मित्र हा पाणी कमी होईल या शक्यतेने घरातच थांबला होता. पाणी कमी होण्याऐवजी वाढतच गेले. वेगाने प्रवाह असल्यामुळे सन्मित्र पत्र्यावर चढला. ग्रामस्थांना आवाज दिल्यानंतर सन्मित्रला वाचवण्यासाठी सर्वजणं सरसावले. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर अखेर दोरी कंबरेला बांधून त्याला बाहेर काढण्यात आले. त्यांच्या घरातील सर्वच साहित्य वाहून गेले होते.

शामला शांताराम कोळसेकर यांचे 3 लाख 27 हजाराचे नुकसान झाले. त्यांच्या शेजारी असलेल्या मनोहर बापू नाचणकर यांच्या घरातील सर्वच साहित्य पुरात वाहिले. कपडे-लत्ते, सोन्या-नाण्यासह पैसे असेलेले कपाट, इलेक्ट्रीकचे साहित्य यांसह अनेक वस्तू वाहून गेल्या. यामध्ये सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त भिकाजी तोडणकर यांचे 50 हजार, शशिकांत दाजी बोंबलेंचे 50 हजार, बाळकृष्ण शितप 48 हजार, मधूकर बोंबले 14 हजार, यशवंत बोंबले 65 हजार 675, छाया पांडुरंग बोंबले यांचे नवीन घरकुलाचे 81 हजार 650, शिवाजी सदाशिव बोंबले 68,400, नागेश चव्हाण 55 हजार रुपयांचे नुकसान झाले.

पुर आल्याचे लक्षात आल्यानंतर नागपूरकर पेठेतील सुमारे पन्नासहून अधिक घरांतील लोक जागे होते. हनुमान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी हात दिला. नागपूरपेठमध्ये माझ्या आयुष्यात अशा प्रकारे पुराचे तांडव प्रथमच पहायला मिळाले आहे. ती रात्र अंगावर काटा आणणरी होती, असे ग्रामस्थ मितेश कामेरकर यांनी सांगितले.

  • दोरीच्या साह्याने तरुणाला वाचवले

  • मोठा लोंढा आला अन् घरांना पाण्याचा वेढा

  • अवघ्या गावाने रात्री काढली जागून

  • एकट्या नाचणकराचें 10 लाखाचे नुकसान

  • पुर आल्याची पहिली घटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT