Heavy Trafic In Kashedi Ghat Ratnagiri Marathi News 
कोकण

कशामुळे लागल्या कशेडी घाटात वाहनांच्या रांगा 

सकाळवृत्तसेवा

खेड ( रत्नागिरी ) -  अत्यावश्‍यक सेवेच्या वाहनांमधून होत असलेली प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरवात केली आहे. प्रवाशी वाहतूक करणारे एकही वाहन जिल्ह्यात प्रवेश करु नये, यासाठी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी येथे मुंबई, पुणे या सारख्या शहरातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी होत आहे. त्यामुळे कशेडी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसताहेत. 

मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने कोकणातील चाकरमान्यांना गावी यायचे वेध लागले आहेत. काही चाकरमान्यांनी विविध मार्गाने पायी चालत गाव गाठण्याचा प्रयत्न केला आहे.

औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांसाठी कच्चा माल घेऊन येणारे मालवाहू ट्रक, जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने किंवा कोकणातील हापूस मुंबईत घेऊन जाणारे ट्रक, टेम्पो यांचा रस्त्यावर धावताहेत. अत्यावश्‍यक सेवेचे वाहन चालविणारा चालकही ज्यादा पैसे मिळत असल्याने अशा प्रवाशांना आपल्या वाहनांमध्ये बसवून कोकणात आणत आहेत.

मात्र सध्या ग्रीन झोनमध्ये असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्यादृष्टीने अशाप्रकारे मुंबई, पुणे या रेड झोनमधील माणसं जिल्ह्यात येणे धोक्‍याचे असल्याने प्रशासनाने जिल्ह्याच्या वेशीवरच कडक तपासणी सुरु केली आहे. मुंबई, पुणे येथून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची अगदी कसून तपासणी करुनच ते वाहन जिल्ह्याच्या हद्दीत सोडले जात आहे. या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वाहन चालक व क्‍लिनरच्या आरोग्याचीही तपासणी केली जात आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT