Heavy Wind Affects Fishing In Ratnagiri Marathi News
Heavy Wind Affects Fishing In Ratnagiri Marathi News  
कोकण

मतलई वाऱ्यांमुळे मच्छीमारीला ब्रेक 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - अचानक सुटलेल्या मतलई वाऱ्यांमुळे मच्छीमारीला बुधवारी (ता. 26) दुपारपर्यंत ब्रेक लागला होता. मासेमारीसाठी गेलेल्या काही नौकांनी समुद्रातच नांगर टाकून ठेवला होता. मासळी कमी मिळत असल्याने मच्छीमार त्रस्त आहेत. 

फेब्रुवारी महिन्यात थंडी होती. मात्र पंधरवड्यानंतर कमाल पारा वाढत गेला. मंगळवारी (ता. 25) राज्यातील काही भागांमध्ये गारपिटीचा पाऊस झाला. कोकणात उष्मा वाढल्यामुळे पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. ऑगस्ट सुरू झाल्यानंतर सहा छोटी-मोठी वादळे येऊन गेली. त्याचा परिणाम मासेमारीवर झाला. चार ते आठ दिवस नौका बंदरात उभ्या ठेवाव्या लागल्या.

31 डिसेंबरला पर्ससिननेट मासेमारी बंद झाली. त्यानंतर फिशिंग, ट्रॉलिंगसह गिलनेटद्वारे मासेमारी सुरू आहे. जानेवारी महिन्यात बऱ्यापैकी मासळी मिळते. यंदा ती परिस्थिती नसल्याचे मच्छीमारांचे मत आहे. फेब्रुवारी महिनाही यथातथाच आहे. यंदा हंगामात मासेमारी व्यवसाय सर्वाधिक अडचणीत सापडला आहे. गेले आठ ते दहा दिवस मच्छीमार समुद्रात जात आहेत, पण त्यांना म्हणावी तशी मासळी मिळत नाही.

ट्रॉलिंगला पाच ते दहा टप मासे मिळत आहेत. त्यात बांगडा, दोडी, टायनी, चिंगळं, सुरमई, गेदर यांचा समावेश आहे. बुधवारी पहाटेपासून अचानक वारे वाहू लागले होते. त्यामुळे नौकांनी सुरक्षित बंदरांचा आसरा घेतला. पाण्याला प्रचंड करंट असल्यामुळे जाळी स्थिर राहत नव्हती. काही नौका समुद्रात नांगर टाकून उभ्या होत्या. पाण्यात स्थिर ठेवताना मच्छीमारांची त्रेधातिरपीट उडत होती. दुपारनंतर वाऱ्याचा जोर कमी झाला. सायंकाळी हलके वारे वाहत होते. सायंकाळी नौका पुन्हा मासेमारीसाठी रवाना झाल्या आहेत. 

छोट्या वादळाची प्रतीक्षा 

समुद्रात वादळ झाले की घाबरलेला मासा किनारी भागाकडे वळतो. त्यामुळे मच्छीमारांना अशा छोट्या वादळाची प्रतीक्षा आहे. सध्या ट्रॉलिंगला बांगडा, गेदर, पापलेटसारखे मासे मिळत आहेत. तसेच फिशिंगला थोडीफार मासळी मिळत आहेत. सध्या चिंगळाला 250 ते 400 रुपये किलोला दर मिळत आहे. तसेच बांगडा 150 ते 170 किलो, मांदेली 100 रुपये किलो, सुरमई 500 ते 600 रुपये किलो, पापलेट 700 रुपये तर गेदर 150 रुपये किलो मिळत आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT