Help To Sindhudurg Citizens Who Trap In Goa  
कोकण

गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गवासियांना यांची मदत 

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात अडकून पडलेल्या जिल्ह्यातील युवक - युवतींना युवा सिंधू फाउंडेशनच्यावतीने मदतीचा हात देत जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात एकविस दिवसाची संचारबंदी जाहीर केली असतानाच जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात गोवा राज्यात कामानिमित्त असलेली युवक - युवती अडकून पडली आहेत. त्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तसेच राजकीय पुढाऱ्यांकडून प्रयत्नही झाले; मात्र दोन राज्यांचा हा विषय असल्याने हे प्रयत्न असफल ठरले.

दोडामार्ग तालुक्‍यातील काही जणांना विशेष बाब म्हणून जिल्ह्यात नेण्यात आले; मात्र अद्यापही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील युवक - युवती तसेच अन्य लोक गोवा राज्यातील विविध भागांमध्ये अडकून पडले आहेत. संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यामध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून केंद्राचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहे.

त्यामुळे अशा परिस्थितीत पैसे नसल्यामुळे तसेच जीवनावश्‍यक वस्तूही संपल्यामुळे आम्ही खायचे काय? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. त्यामुळे आम्हाला जिल्ह्यामध्ये प्रवेश द्या, अशी विनवणी त्यांच्याकडून करण्यात येत होती. एकूणच त्यांच्या या समस्यांचा विचार करून जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी यासाठी जोरदार प्रयत्न केले; मात्र हे प्रयत्न त्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी अपुरे पडले. त्या युवक-युवतींची काळजी त्यांचे कुटुंब तसेच आई-वडिलांकडून करण्यात येत असून अनेक संस्था तसेच लोकप्रतिनिधी नेत्यांना जीवनावश्‍यक वस्तू पुरवण्यासाठी पावले उचलली आहेत. 

येथील युवा सिंधू फाउंडेशनही अशा योग युवतींसाठी जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पुढे सरसावली असून तांदूळ, डाळ, साखर, बटाटे, कांदे आदी वस्तू फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेले आहेत. आतापर्यंत मडकई, कुंडई येथील युवक-युवतींना धान्यपुरवठा करण्यात आला आहे. अजूनही सालीगाव, वेरणा, म्हापसा, कलंगुट या भागातील युवतींना मदत करण्यासाठी युवा सेंटर फाउंडेशनच्यावतीने धावपळ सुरू आहे. अन्य कोणाला अशा प्रकारचे मदत करायची असल्यास त्यांनी फाउंडेशनकडे संपर्क साधावा, असे आवाहन फाऊंडेशनचे सागर नाणोसकर यांनी केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT