Helping hand of traders in Ratnagiri support in traders kokan marathi news 
कोकण

अंधारलेले आयुष्य झाले प्रकाशमय ; एक- एक काडीची झाली लाखाची मदत

राजेश शेळके

रत्नागिरी : लॉकडाउनमुळे संकटात आलेल्या शहरातील एका व्यावसायिकाला सर्व व्यापारी बंधूंनी मदतीचा हात देत त्याचे अंधारलेले आयुष्य पुन्हा प्रकाशमय केले आहे. धनजीनाका येथील दिलावर शेमना असे त्या व्यापार्‍याचे नाव आहे. वीज बिल न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित केला होता. अनेक महिने तो अंधारातच आपला व्यवसाय करत होता. व्यापार्‍यांच्या हे लक्षात आल्यानंतर व्यापार्‍यांनी वीज बिल भरून व्यापारी वर्गाने आपले दातृत्व दाखवून दिले आहे.


शहरातील व्यापार्‍यांच्या एकजुटीने एक कुटुंब उभा राहिले आहे. त्याच्या या कृतीचे सर्वंत्र कौतुक होत आहे. स्वतःवर लॉक डाऊनचे संकट असताना देखील निसर्ग चक्रीवादळात बाधित कुटुंबीयांना लाखो रुपयांची मदत रत्नागिरीतील व्यापार्‍यांनी केली होती. याच जमवलेल्या रकमेतून आज रत्नागिरीतील एका व्यापार्‍याचा अंधाराच्या साम्राज्यात अडकलेला व्यापार पुन्हा चालू होण्यास मदत केली आहे. शहरातील धनजीनाका येथे दिलावर शेमना यांचे फोटो फेम तयार करण्याचे एक छोटेसे दुकान आहे. लॉकडाऊनच्या संकटात यांचा व्यापार उद्ध्वस्त झाला. वीज बिल थकल्याने मागील काही महिन्यापूर्वी महावितरणने वीजप्रवाह खंडित केला.

 पाणीपट्टी, मुलांची शाळेची फी असे सर्व थकले. शेवटी मोठ्या आशेने शेमना यांनी रत्नागिरीतील तरुण व्यापार्‍यांकडे धाव घेतली. या तरुण व्यापार्‍यांनी चक्रीवादळात बाधित झालेल्या कुटुंबीयांसाठी शहरातील व्यापार्‍यांकडून मदत गोळा केली होती. त्यापैकी काही शिल्लक रकमेतून आज शेमना यांचे वीजबिल भरण्यात आले. बिल भरल्यानंतर महावितरणकडून त्यांचा वीज पुरवठा सुरू केला. यावेळी राजकुमार जैन, गणेश भिंगार्डे, नीलेश शामकांत मलुष्टे, हेमंत वणजु, महावितरण चे जनसंपर्क अधिकारी संजय वैशंपायन, मकरंद खातू, सौरभ मलुष्टे, योगेश मलुष्टे, संदेश गांगण, मुकुल मलुष्टे, सचिन केसरकर, कौस्तुभ दीक्षित, अमेय वीरकर आदी युवा व्यापारी उपस्थित होते.


रत्नागिरीतील प्रत्येक व्यापार्‍याचे योगदान या मदतीत असल्याने या युवा व्यापार्‍यांकडून सर्वांना धन्यवाद देण्यात आले. संबंधित व्यापार्‍याचे बिल भरणा केल्यानंतर तत्काळ महावितरण कंपनीने शेमना यांची वीज पूर्ववत केली. यावेळी महावितरण कंपनीच्या वतीने मेणबत्ती लावण्यासाठी येणार्‍या खर्चापेक्षा सुद्धा वीज बिल कमी येते. मात्र ते वेळेवर भरून सहकार्य करा,असे आवाहन केले.


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk’s Tesla: टेस्लाची गाडी आता मुंबईत धावणार; BKC मध्ये पहिलं शोरूम उघडणार, किती आहे किंमत?

Pune: गॅस खरेदी करताय? सावधान! 2 ते 3 किलो गॅसची होतेय चोरी; तरुणांच्या सतर्कतेमुळे काळाबाजार उघड, पुण्यात काय घडलं?

Medical College: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन! 'अहिल्यानगर शहरातच वैद्यकीय महाविद्यालय होणार'; आमदार जगतापांनी घेतली भेट

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

SCROLL FOR NEXT