Nilesh Rane
Nilesh Rane  sakal
कोकण

सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर हायव्होलटेज ड्रामा; निलेश राणे-पोलिसांमध्ये बाचाबाची

Amit Ujagare (अमित उजागरे)

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन मंगळवारी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं फेटाळला. यावेळी पोलिसांनी त्यांना न्यायालयाबाहेर अडवलं. दरम्यान, त्यांच्या मदतीसाठी त्यांचे मोठे बंधु माजी खासदार निलेश राणे पुढे आले, यावेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली. त्यामुळं कोर्टाच्या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. (High voltage drama outside Sindhudurg court Nilesh Rane Police clash)

अटकपूर्व जामीनासाठी सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर कोर्टानं त्यांना कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार, नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. पण हा अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे आपल्या कारमधून घरी निघालेले असताना पोलिसांनी त्यांच्या कारसमोर आपली वाहनं लावत त्यांना घेराव घातला होता. यानंतर माजी खासदार निलेश राणे यांनी तुम्ही कोणत्या नियमात अडवलं आहे? असा सवाल पोलिसांना विचारला. यावेळी पोलिसांसोबत काहीकाळ त्यांची बाचाबाची झाली.

सुप्रीम कोर्टानं नितेश राणे यांना दहा दिवसांसाठी अटकेपासून दिलासा दिला असल्यानं त्यांना अटक करता येणार नाही. पण तरीही तुम्ही त्यांना अडवत असाल तर तसा आदेश दाखवा, अशी मागणी निलेश राणेंनी पोलिसांजवळ केली. यावेळी पोलीस निरुत्तर झाले. यानंतर त्यांचे वकील संग्राम देसाई आणि सतीश मानशिंदे नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत घेऊन गेले.

दरम्यान, नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळताच अटक करण्यासाठी व्यूहरचना करणाऱ्या सिंधुदुर्ग पोलिसांना अखेर माघार घ्यावी लागली. सर्वोच्च न्यायालयाचा दहा दिवसांच्या असलेल्या दिलाशामुळे पोलिसांना राणेंना अटक करण्यास कायदेशीर अडचण आली. त्यामुळे सुमारे पाऊण तास चाललेल्या या ड्राम्यानंतर राणे अखेर घरी गेले आहेत. दरम्यान, उच्च न्यायालयात आजच अपील करणार असल्याचं राणेंचे वकील राजेंद्र रावराणे यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT