Higher and Technical Minister Uday Samant press conference kokan 
कोकण

नाणारवर भाष्य करताना पक्षाशी चर्चा करून साळवींनी बोलायला हवे होते

राजेश शेळके

रत्नागिरी : नाणार (ता. राजापूर) रिफायनरीचा विषय अधिसूचना रद्द करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपवला आहे. त्यावर राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी केलेले वक्तव्य हे वैयक्तीक आहे. तसा खुलासही साळवी यांनी केला आहे. तरी नाणारवर भाष्य करताना साळवी यांनी पक्षाशी चर्चा करून बोलायला हवे होते, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिणमंत्री उदय सामंत यांनी दिली. 

नाणार रिफायनरीला स्थानिकांचा पाठिंबा असेल तर मुख्यमंत्री त्याचा सकारात्मक विचार करतील, असे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी केलेले वक्तव्य त्याना चांगलेच महागात पडले. त्यांच्या वक्तव्यावर पक्षाला खुलासा करावा लागला. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, रिफायनरीची अधिसूचना रद्द करून हा विषय संपवला आहे. 


त्यामुळे त्यावर साळवी यांना भाष्य करण्याची आवश्‍यकता नव्हती. तरी त्यांनी वैयक्तीक मत असल्याचा खुलासा केला आहे. त्यानंतर पक्षाचे सचिव विनायक राऊत यांनी खुलासा केला आहे. राजन साळवींचे ते वैयक्तीक मत आहे. केंद्रीय मंत्र्यांनीही देखील सर्वांना कोरोनाची मोफत लस देण्याची घोषणा केली आणि ते वक्तव्य संध्याकाळी मागे घेतले, असे कधीतरी होते. साळवींनी पक्षाशी चर्चा करून बोललायला हवे होते, असे सामंत म्हणाले. 

संपादन- अर्चना बनगे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Sri Lanka Test Series: भारत-श्रीलंका कसोटी मालिकेची तारीख जाहीर; WTC Final साठी दोन महत्त्वाचे सामने केव्हा व कुठे?

सायलीचं आहे खरी तन्वी, सुभेदारांसमोर येणार सगळ्यात मोठं सत्य, 'ठरलं तर मग'चा शेवट सुरू?

Latest Marathi News Live Update : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेवर अंबादास दानवेंची टीका; "मृत्यूसाठी महापालिकाच जबाबदार"

VTU Result 2026: इतिहास घडला! परीक्षा संपताच अवघ्या ५ मिनिटांत 'व्हीटीयू'चा अभियांत्रिकीचा निकाल जाहीर; ६० हजार विद्यार्थ्यांना दिलासा

Maharashtra Government RTI : माहिती अधिकार कायद्यात बदल होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार, अण्णा हजारेंच्या इशाऱ्यानंतर सरकारची नरमाई

SCROLL FOR NEXT