highway work issue press conference mla nitesh rane kankvli sindhudurg
highway work issue press conference mla nitesh rane kankvli sindhudurg 
कोकण

चौपदरीकरणाबाबत आमदार नीतेश राणे म्हणाले....

सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) - सेवा रस्त्यावर येणारा चिखल, तुंबलेली गटारे व इतर सर्व कामे आठ दिवसांत पूर्ण करा. त्याबाबत कोणतीही कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत, असे निर्देश आमदार नीतेश राणे यांनी दिले. तसेच झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी पुढील चार दिवसांत कणकवलीत येऊन आढावा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

कणकवलीतून जाणाऱ्या महामार्गावर पादचारी, वाहन चालक तसेच शहरवासीयांना अनेक समस्या भेडसावत आहेत. त्याची सोडवणूक करण्यासाठी आमदार राणे यांनी नगराध्यक्ष दालनात बैठक घेतली. यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक बंडू हर्णे, मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत, कविता राणे, शिशिर परुळेकर, किशोर राणे, बंडू गांगण, महामार्ग प्राधिकरणाचे मणेर, दिलीप बिल्डकॉनचे अधिकारी उदयविर चौधरी, कपीलकुमार, अनुप शर्मा आदी उपस्थित होते. 

गेले दोन दिवस सुरू असलेल्या मॉन्सूनपूूर्व सरींमुळे महामार्ग चिखलमय झाला आहे. याशिवाय शहरातील नाले मोकळे केले नसल्याने यंदाही शहरात पाणी तुंबण्याची शक्‍यता नगरसेवक बंडू हर्णे यांनी व्यक्‍त केली. तर आठवडाभरात नाल्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. शहरातील गटारांची कामे अर्धवट असल्याने यंदाही महामार्गावर पाणी तुंबण्याची शक्‍यता नगरसेवकांनी व्यक्‍त केली. यावर आमदार नीतेश राणे यांनी शहरातील सर्व अपूर्ण कामे आठ दिवसांत पूर्ण करा, असे निर्देश दिले. तसेच झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी चार दिवसानंतर पुन्हा पाहणी करणार असल्याचेही ते म्हणाले. शहरातील महामार्ग समस्या आढावा बैठकीत पटवर्धन चौकात साठणारे पाणी, पटवर्धन चौक ते गांगोमंदिर पर्यंत अपूर्ण असलेले गटार, गांगोमंदिर परिसरात अपूर्ण असलेला रस्ता आदी मुद्देही नगरसेवकांनी मांडले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT