Hiking On Wanarling By Akash And Rutuja Ratnagiri Marathi News 
कोकण

आकाश - ऋतुजा यांनी केला "वानरलिंगी" सुळका सर 

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - घनदाट जंगल, सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वत रांगा, वेगवान वारा यांच्याकडे बघताच अंगावर काटा उभा रहातो. असा 90 अंशातील 400 फुट उंच असलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील घाटघर येथील जीवधन किल्ल्यासमोरील वानरलिंगी सरळ सुळका. येथील आकाश पालकर व ऋतुजा शिंदे यांनी सुळका सर करण्याचे आव्हान पेलले. सुळका सर करणाऱ्या या दोघांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे. 

येथील माऊंटेनिअर्स असोसिएशन संस्थेकडून शिरगाव-आडी येथील आकाश प्रमोद पालकर हा रत्नागिरी गृहरक्षक दलात सेवा बजावत आहे. कोंडगाव-साखरपा (ता. संगमेश्‍वर) येथील ऋतुजा नवनाथ शिंदे ही साखरपा येथील सावंत महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहेत. या दोघांनी वानरलिंगी सुळका सर केला. रत्नागिरीचे ज्येष्ठ गिर्यारोहक, माऊंटेनिअर्स असोशिएशनचे अध्यक्ष दिवंगत मोहन खातू यांनी आकाशला माऊंटेनिअर्सची ओळख करून दिली होती. खातू यांना आदरांजली म्हणून वानरलिंगी सुळका मोहिम ठेवण्यात आली होती.

मुरबाड येथील सह्यगिरी ऍडव्हेंचर या संस्थेचे लिडर दीपक विशे यांच्या मदतीने ही चढाई यशस्वी झाली. 13 मार्चला सकाळी 10.54 मिनिटांनी सुळका चढाईस सुरवात झाली. रात्री 7.40 मिनिटांनी सुळक्‍याची शिरस्थानी पोचलो. अवघ्या साडेसात तास कठीण परिस्थितीशी लढत सोसाट्याचा वारा झेलत जीवघेणी चढाई केली असल्याचे पालकर व शिंदे या दोघांनी सांगितले. सुळक्‍यावर पोचल्यानंतर मोहन खातू यांनी श्रद्धांजली वाहिली. या मोहिमेसाठी माऊंटेनिअर्स असोशिएशन संस्थेचे सेक्रेटरी राजेश नेने, दीपक विशे व सहकारी टीम यांनी सहकार्य केले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : नंदुरबारमध्ये येणाऱ्या निवडणुकीत मतदान न करण्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT