hiv Sena Sawantwadi taluka chief Rupesh Raul criticizam BJP district president Rajan Teli and mayor Sanju Parab kokan politacl news 
कोकण

"परबांचे राणेंवरील बेगडी प्रेम; मौन सोडण्यास पळता भुई थोडी होईल'

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी :  एका रात्रीत चार पक्ष बदलणाऱ्या राजन तेली यांना स्वाभिमान शोभत नाही. त्यांनी खासदार नारायण राणे यांना धृतराष्ट्राची उपमा दिली होती ते विसरले असतील; पण जनता विसरली नाही. नगराध्यक्ष संजू परब यांनी खासदार राणे यांची जंत्री खासदार विनायक राऊत यांच्या घरी शिवसेनेच्या प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर वाचली. त्यामुळे त्यांचे राणे यांच्यावरील बेगडी प्रेम सर्वश्रुत आहे. ते नौटंकीबाज असल्याची टीका शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली. 

भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवसेना दहशत पसरवत असल्याची टीका केली त्याचा आयोजित पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख राऊळ यांनी समाचार घेतला. यावेळी शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, उप तालुकाप्रमुख राघोजी सावंत, महिला संघटक अपर्णा कोठावळे, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, शब्बीर मणियार, संजय पेडणेकर, गजानन नाटेकर, विनायक सावंत आदी उपस्थित होते. 

 राऊळ म्हणाले, "राजन तेली आणि संजू परब यांची शिवसेनेवरील टीका म्हणजे उलट्या बोंबा आहेत. आतापर्यंत भाजपाने दहशत निर्माण केली नाही; परंतु राणे समर्थकांनी जिल्ह्यात दहशत निर्माण केल्याची जनतेला कल्पना आहे. त्यामुळे जनतेने मतपेटीतून त्यांना हिसका दाखवला आहे. राजन तेली यांनी एका रात्रीत चार पक्ष बदलले. त्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे. खासदार राणे यांना धृतराष्ट्र म्हणून उपमा दिली. ते राजन तेली यांनी राणे कुटुंबीयांची तळी उचलत आहे, हे नौटंकी बात आहे. त्यामुळे भाजपची दयनीय आहे. 

शिवसेना आणि भाजपा युती असताना भाजपाची शिस्तप्रिय भूमिका सर्वश्रुत आहे; मात्र राणे समर्थकांनी भाजपाचे नाव वापरून शिस्तप्रिय भाजप मोडीत काढली आहे. निलेश राणे यांना भाजपने पद जाहीर केल्यानंतर हे चित्र बदलले आणि निलेश राणे बेताल वक्तव्य करू लागले आहेत. नगराध्यक्ष परब देखील बेताल वक्तव्य करून नौटंकी बातची भूमिका बजावत आहेत. सावंतवाडी शहर शांत सुसंस्कृत आहे. यापूर्वीच्या नगराध्यक्षांची भूमिका संजू परब यांच्या सारखी कधीच नव्हती. 

व्यापारी, भाजीविक्रेते यांच्यात कधी वाद निर्माण झाले नव्हते; मात्र परब यांनी भांडणे लावण्याचा प्रयत्न केला आहे. संजू परब यांच्या दम होता तर त्यांनी गांधी चौकात प्रतिमेचे दहन करणारे आंदोलन कशाला केले नाही ते फक्त पोकळ धमक्‍या देतात. परब यांनी पोकळ धमक्‍या देण्याचे सोडून शहराचा विकास साधावा. माझ्यावर नेमळे आणि मळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचाबाबत टीका करणारे नगराध्यक्ष परब हे इन्सुली ग्रामपंचायतीत निरीक्षक होते. पंचायत समिती सभापती देखील गावचे होते; मात्र त्यांच्या हातून सरपंच पद गेल्याने त्यांच्या मर्मावर बोट ठेवल्याच्या रागाने ते माझ्यावर टीका करत आहे. त्यांनी टीका करण्यापूर्वी आपल्या बुडाखाली काय जळते आहे त्याची खात्री करावी.'' 

ते म्हणाले, "नगराध्यक्ष निवडणुक पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मुद्यावर संजू परब खासदार विनायक राऊत यांच्या तळेगाव येथील घरी गेले होते. तेथे त्यांच्या पायावर घालून घेऊन खासदार राणे कुटुंबाची जंत्री वाचली. त्यावेळी मी तेथे उपस्थित होतो. राणे यांच्याबद्दल संजू परब काय काय बोलले याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्यामुळे राणे यांच्यावरील बेगडी प्रेम परब यांनी दाखवू नये. वेळ आल्यास ते खासदार राऊत यांच्यासमोर काय काय बोलले त्याचे मौन सोडण्यास मी तयार आहे. त्यानंतर त्यांची पळता भुई थोडी होईल.'' 

संपादन- अर्चना बनगे


 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT